Pune Crime | गॅलरीमधील झाडांना पाणी देण्यावरुन दोन कुटुंबात वाद, महिलेचा विनयभंग करणाऱ्या दाम्पत्यावर FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | गॅलरीतील झाडांना पाणी देत असताना थोडे पाणी रस्त्यावर साचल्याच्या कारणावरुन दोन कुटुंबात वाद (Dispute) झाला. या वादातून एका दाम्पत्याने (Couple) महिलेचा विनयभंग (Molestation Case) केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) आयपीसी 354, 323 ,506, 504 अन्वये एका दाम्पत्यावर गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime)

 

याबाबत कोंढवा परिसरात राहणाऱ्या 40 वर्षीय महिलेने बुधवारी (दि.27) कोंढवा पोलिसांकडे तक्रार केली आहे. हा प्रकार सोमवारी (दि.25) दुपारी साडेतीनच्या सुमारास घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेचे पती हे त्यांच्या घरातील गॅलरीमध्ये असलेल्या झाडांना (Plant) पाणी (Water) देत होते. त्यावेळी थोडे पाणी घराच्या समोरील रोडवर साचले. यावरुन आरोपींनी फिर्यादी यांच्या सोबत वाद घातला. (Pune Crime)

 

आरोपी महिलेने फिर्यादी यांना घरातून बाहेर ओढत आणून मारहाण (Beating) केली. तसेच फिर्यादी यांचे केस ओढून शिवीगाळ (Swearing) केली. तर आरोपी महिलेच्या पतीने फिर्यादी यांच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करुन मारहाण केली. तसेच घराला आग लावून देण्याची धमकी (Threat) दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

 

 

Web Title :- Pune Crime | Two families argue over watering of trees in gallery FIR against couple for molesting woman

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा