Pune Crime | ‘मोक्का’ गुन्ह्यातील दोन फरार आरोपींना बिबवेवाडी पोलिसांकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | ‘मोक्का’ कारवाईनंतर (MCOCA Action) Mokka फरार झालेल्या दोन सराईत गुन्हेगारांना बिबवेवाडी पोलिसांनी (Pune Police) बेड्या ठोकल्या आहेत. आरोपी मागील काही दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देत होते. अखेर पोलिसांनी त्यांना कात्रज कोंढवा रोडवर सापळा रचून (Pune Crime) अटक केली. अनिल रमेश चव्हाण (वय 21, रा. अंबिकानगर, अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी), रोहित हेमंद बोदरे (वय 20, रा. गुजर वस्ती, कात्रज कोंढवा रोड, कात्रज) अशी अटक (Arrest) केलेल्या आरोपींची नावे आहेत.

 

आरोपींवर पुणे शहरामध्ये अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. अनिल चव्हाण हा टोळीप्रमुख असून, त्याच्या टोळीवर मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. यातील सात जणांना अटक करण्यात आली आहे, तर मोक्का गुन्हा दाखल झाल्यापासून अनिल आणि रोहित हे फरार झाले होते. पोलीस त्यांचा शोध घेत होते. आरोपींनी पुणे शहरात टोळी वर्चस्वातून संघटितरित्या गुन्हे केले आहेत. (Pune Crime)

 

पोलीस आरोपींचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार अतुल महांगडे (Atul Mahangde) यांना आरोपी रोहित बोदरे व अनिल चव्हाण हे बोदरे याच्या घरी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी रोहित बोदरे याच्या घराच्या परिसरात सापळा रचला. आरोपी बोदरे याच्या घराकडे जात असताना चारी बाजूने घेरून त्यांना अटक केली. पुढील कार्य़वाहीसाठी आरोपींना वानवडी विभागाचे सहायक पोलीस आयुक्त पौर्णिमा तावरे (Wanwadi Division ACP Poornima Taware) यांच्या ताब्यात दिले आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग नामदेव चव्हाण (Addl CP Namdev Chavan),
पोलीस उपायुक्त परिमंडळ -5 विक्रांत देशमुख (DCP Vikrant Deshmukh),
सहायक पोलीस आयुक्त पौर्णिमा तावरे यांच्या सूचनेनुसार बिबवेवाडी पोलीस ठाण्याचे (Bibwewadi Police Station)
वरिष्ठ पोलीस निरीक्षक संगीता जाधव (Senior Police Inspector Sangeeta Jadhav)
यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे (API Pravin Salunkhe), पोलीस अंमलदार जाधव, महांगडे, येवले, मोरे, पाटील, काळे, नवले, धुमाळ यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Pune Crime | Two fugitive accused in ‘Mokka’ crime arrested by Bibwewadi police

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Chandrakant Patil | ‘माझ्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी जाहीर माफी मागतो’ – चंद्रकांत पाटील

Mumbai Police | पोलिसांनी जप्त केलेल्या स्टोअर रूममधील सिलिंडरचा स्फोट; पोलीस अधिकारी गंभीर जखमी

Sharad Pawar | ‘शाई फेकणे चूक; पण चंद्रकांत पाटलांच्या विधानाकडे…’; काय म्हणाले शरद पवार