Pune Crime | हिंजवडी आणि भोसरीत महिलांच्या विनयभंगाच्या दोन घटना

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पिंपरी चिंचवडमध्ये (Pimpri Chinchwad) दोन महिलांचा विनयभंग (Molestation Case) केल्याच्या घटना घडल्या आहेत. भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या (Bhosari MIDC Police Station) हद्दीत एका कंपनीत काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. तर हिंजवडीमध्ये (Hinjawadi) एका सोसायटीत घरकाम करणाऱ्या महिलेचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. हिंजवडी पोलीस ठाण्यात (Hinjewadi Police Station) राजु कतरी (Raju Katari) तर भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात किरण बोरसे (Kiran Borse) याच्यावर आयपीसी 354,509 नुसार गुन्हा (FIR) दाखल करण्यात (Pune Crime) आला आहे.

 

हिंजवडी पोलीस ठाण्यात एका 40 वर्षाच्या महिलेने फिर्याद दिली आहे. हा प्रकार रविवारी (दि.24) सकाळी दहाच्या सुमारास भुमकर चौक (Bhumkar Chowk) परिसरातील एका सोसायटीमध्ये घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला आरोपीकडे घरकाम करण्याचे काम करते. रविवारी सकाळी दहाच्या सुमार महिला घरात काम करत असताना आरोपीने तिच्याकडे शरीर संबंधाची (Physical Relationship) मागणी केली. त्यानंतर तिचा हात आणि पदर ओढून तिच्यासोबत अश्लील कृत्य केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक बोरकर (PSI Borkar) करत आहेत. (Pune Crime)

दुसऱ्या घटने एका 32 वर्षीय महिलेने भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी किरण बोरसे (पूर्ण नाव पत्ता माहित नाही) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला भोसरी एमआयडीसी येथील टी ब्लॉकमधील (T Block) एका कंपनीत काम करते. कंपनीत काम करत असताना आरोपीने फिर्यादीसोबत अश्लील चाळे करुन मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पी.ए. कदम (PSI P.A. Kadam) करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Two incidents of molestation of women in Hinjewadi and Bhosari

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा