Pune Crime | MSEB च्या डी. पीमधून तांब्याची तार चोरणारे दोन जण गजाआड, 101 किलो तांबे जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे ग्रामीण (Pune Crime) परिसरात एम.एस.ई.बी.चे डी.पी (MSEB DP) फोडून त्यामधून तांब्याच्या तारा चोरणाऱ्या दोन जणांना लोणी काळभोर पोलिसांनी (Loni Kalbhor police) अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरीच्या गुन्ह्यातील (Pune Crime) 80 हजार 800 रुपये किमतीचे 101 कि.ग्रॅम वजनाच्या तांब्याच्या तार (Copper wire) जप्त केल्या आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींवर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात (Loni Kalbhor police station) चार गुन्हे दाखल आहेत. ही कारवाई कदमवाकवस्ती गावच्या हद्दीत करण्यात (Pune Crime) आली.

 

अमित उर्फ काल्या बजरंग चव्हाण (वय-23 सध्या रा. शिवाजीनगर वस्ती, खेडशिवापुर, ता. हवेली मुळ रा. इंदिरानगर, कुडाळ ता. जावली जि. सातारा), सागर विलास पवार (वय-23 रा. आबा कोंडे यांची चाळ, खेड शिवापुर, मुळ रा. कुडाळ, ता. जावली जि. सातारा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

 

लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत MSEB चे डी.पी फोडून त्यामधील तांब्याची तार चोरी होण्याच्या घटना घडल्या आहेत.
या गुन्ह्याचा तपास करत असताना तपास पथकाचे प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक राजु महानोर (API Raju Mahanor)
यांना दोन जण कदमवाकवस्ती गावच्या हद्दीत तांब्याच्या तार विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली.
त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची (Pune Crime) कबुली दिली.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण (Addl CP Namdev Chavan),
पोलीस उपायुक्त परिमंडळ 5 नम्रता पाटील (DCP Namrata Patil),
सहायक पोलीस आयुक्त कल्याणराव विधाते (ACP Kalyanrao Vidhate),
वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी (Senior Police Inspector Rajendra Mokashi),
पोलीस निरीक्षक गुन्हे सुभाष काळे (Police Inspector Subhash Kale)
यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील सहायक पोलीस निरीक्षक राजु महानोर,
पोलीस हवालदार नितीन गायकवाड, पोलीस नाईक अमित साळुंके, श्रीनाथ जाधव,
सुनिल नागलोत, संभाजी देविकर, निखील पवार, शैलेश कुदळे, राजेश दराडे, बाजीराव वीर, दिगंबर साळुंके यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Pune Crime | Two persons who stole copper wire from MSEB’s DP were arrested and 101 kg of copper was seized

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Babanrao Lonikar | ‘महाविकास आघाडीचे अनेक आमदार भाजपच्या संपर्कात’

PM Kisan Yojana | ‘या’ तारखेला जमा होईल PM Kisan चा 10 हप्ता, जाणून घ्या रजिस्ट्रेशन करण्याची स्टेप बाय स्टेप प्रोसेस

Bombay High Court | प्रेयसीनं दगा देणं म्हणजे प्रियकराला आत्महत्येस प्रवृत्त करणं? उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल