Pune Crime | ओटी भरायची असल्याची बतावणी करुन दोघा चोरट्यांनी ज्येष्ठ महिलेला लुबाडले

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | किराणा सामान भरण्यासाठी गेलेल्या एका ज्येष्ठ नागरिक महिलेला दोघा चोरट्यांनी देवी आईला तुमची ओटी भरायची आहे, अशी बतावणी करुन त्यांच्याकडून सोन्याचे दागिने, मोबाईल व ५ हजार रुपये रोख असा ऐवज हातचलाखीने काढून घेतला (Pune Crime). याप्रकरणी हडपसरमधील ससाणेनगर (Sasane Nagar, Hadapsar) येथे राहणार्‍या एका ६९ वर्षाच्या ज्येष्ठ महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद दिली आहे.

 

ही घटना ससाणेनगर येथील बालाजी ट्रेडर्ससमोर मंगळवारी दुपारी साडेतीन वाजता घडली. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या किराणा सामान भरण्यासाठी बालाजी ट्रेडर्स या दुकानात गेल्या होत्या. त्यावेळी दोघे जण तेथे आले. त्यांच्यापैकी एकाने त्यांना देवी आईला तुमची ओटी भरायची आहे, अशी बतावणी केली (Pune Crime). त्यांना भुरळ पाडून गळ्यातील ४५ हजार रुपयांचे मंगळसुत्र काढायला सांगितले. त्यांनी सांगितल्या प्रमाणे त्यांनी मंगळसुत्र काढून ठेवले. तेव्हा दुसर्‍याने ते मंगळसुत्र, मोबाईल, ५ हजार रुपये रोख, बँक ऑफ इंडियाचे डेबिट कार्ड असा ऐवज हातचलाखीने चोरुन नेला.

 

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील फक्त आणि फक्त क्राईमच्या बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा 

 

Web Title :- Pune Crime | Two thieves robbed the senior woman in sasane nagar hadapsar area

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा