Pune Crime | वाहन चाेरट्याकडून दोन गाड्या हस्तगत; डेक्कन पोलिसांची कामगिरी

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन – Pune Crime | एस. एम. जोशी पुलाखाली संशयास्पदरित्या थांबलेल्या चाेरट्याला पकडून डेक्कन पोलिसांनी (Deccan Police Station) वाहनचोरीचे दोन गुन्हे (Pune Crime) उघडकीस आणले आहेत.

 

विनायक किरण पाटोळे (वय १९, रा. जनवाडी) असे या चोरट्याचे नाव आहे. याबाबत डेक्कन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुरलीधर करपे (Senior Police Inspector Murlidhar Karpe) यांनी दिलेल्या माहितीनुसार, तपास पथकातील अंमलदार सागर बाबरे व दादासाहेब बर्डे यांना दुचाकी चोरटा एस एम जोशी पुलाखाली थांबला असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक बाबासाहेब झरेकर व त्यांच्या सहकार्‍यानी विनायक पाटोळे याला पकडले.

 

त्याच्याकडील दुचाकी ही डेक्कन पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीला गेल्याचे आढळून आले. पाटोळे याला अटक करुन अधिक तपास करता अलंकार पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीला गेलेली आणखी एक दुचाकी त्याच्याकडून जप्त (Pune Crime) करण्यात आली.

 

परिमंडळ 1 च्या पोलीस उपायुक्त प्रियांका नारनवरे (dcp priyanka narnaware pune),
सहायक पोलीस आयुक्त बजरंग देसाई (ACP Bajrang Desai),
वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुरलीधर करपे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गुन्हे संजय मोगले,
तपास पथकातील सहायक निरीक्षक बाबासाहेब झरेकर, पोलीस उपनिरीक्षक किशोर शिंदे व त्यांच्या सहकार्यांनी ही कामगिरी केली आहे.

 

Web Title :- Pune Crime | Two vehicles seized from four vehicles; Performance of Deccan Police Station

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Maharashtra Rains | पुण्यात वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी बरसणार, मराठवाड्याला ‘अवकाळी’चा इशारा

Pimpri Corona | पिंपरी चिंचवड शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 67 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

Multibagger Stocks | ‘या’ स्टॉकने आपल्या गुंतवणुकदारांना बनवले करोडपती, 11 वर्षात एक लाखाचे झाले 1 कोटी