Pune Crime | भरधाव वाहनाच्या धडकेत मंचर येथील पती-पत्नीचा जागीच मृत्यू

पुणे / मंचर : पोलीसनामा ऑनलाइन –  Pune Crime | दुचाकीला अज्ञात वाहनाने (unknown vehicle) पाठिमागून जोरदार धडक दिल्याने (two wheeler hit) दुचाकीवरील पती-पत्नीचा जागीच मृत्यू (couple died) झाल्याची घटना पुणे जिल्ह्यातील (Pune Crime) मंचर येथे घडली आहे. हा अपघात मंचर घोडेगाव रोडवरील (Manchar Ghodegaon Road) वडगाव काशिंबेग गावच्या हद्दीत आज (सोमवार) सकाळी साडे अकराच्या सुमारास झाला. एकनाथ बबनराव नाईक (वय-47) व संगीता एकनाथ नाईक (वय-42 दोघे रा. नारोडी) असे अपघातात ठार झालेल्या पती-पत्नीचे नाव आहे.

 

मंचर पोलिसांनी (Manchar police) दिलेल्या माहितीनुसार, कोशिंबेग गावच्या हद्दीतील भीमाशंकर हॉस्पिटलसमोर (Bhimashankar Hospital) हा अपघात झाला.
यामध्ये नाईक दाम्पत्याचा गंभीर जखमी होऊन जागीच मृत्यू झाला. मुळचे नारोडी येथील रहीवासी असलेले नाईक दाम्पत्य कामानिमित्त चाकण (Chakan) येथे राहतात.
एकनाथ हे माथाडीमध्ये काम करतात. रविवार सुट्टी असल्याने ते गावी आले होते.
आज सकाळी साडेअकराच्या सुमारास मंचर घोडेगाव रस्त्याने ते पत्नीला घेऊन दुचाकी (एमएच 14 डी क्यू 5604) वरुन मंचर बाजूने घोडेगावच्या दिशेने चालले होते.

 

त्यावेळी पाठिमागून भरधाव वेगात आलेल्या अज्ञात वाहनाची धडक त्यांच्या दुचाकीला बसली.
यामध्ये गंभीर जखमी (Seriously injured) झालेल्या नाईक दाम्पत्याला उपचारासाठी मंचर उपजिल्हा रुग्णालयात (Manchar Sub-District Hospital) नेण्यात आले.
त्यांच्यावर उपचार सुरु असताना दोघांचा मृत्यू झाला.
यासंदर्भात सावता दत्तात्रय नाईक यांनी मंचर पोलीस ठाण्यात (Manchar police station) तक्रार दिली आहे.
अपघातास कारणीभूत ठरलेल्या अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा (Pune Crime) दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास मंचर पोलीस करीत आहेत.

 

Web Title : Pune Crime | two wheeler hit unknown vehicle couple manchar died spot pune district

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Modi Government | ‘हा’ बिझनेस सुरू करण्यासाठी सरकार देतंय 2.50 लाख रुपये; पहिल्याच दिवसापासून होईल मोठी कमाई, जाणून घ्या कशी

Mallaika Arora-Arjun Kapoor | मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरमध्ये वाद, नववर्षाच्या स्वागताला देखील सोबत नसणार

Chandrakant Patil | चंद्रकांत पाटील राष्ट्रवादीच्या बंडखोर उमेदवाराच्या भेटीला; चर्चेला उधाण