×
Homeक्राईम स्टोरीPune Crime | महागड्या दुचाकी चोरणारा सराईत गुन्हे शाखेकडून गजाआड, 7 दुचाकी...

Pune Crime | महागड्या दुचाकी चोरणारा सराईत गुन्हे शाखेकडून गजाआड, 7 दुचाकी जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहरातील (Pune Crime) महागड्या दुचाकी चोरणाऱ्या (Bike thieves) सराईत गुन्हेगाराला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट तीनच्या (Pune Police Crime Branch) पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. सराईत गुन्हेगाराकडून तीन लाख रुपये किमतीच्या 7 दुचाकी जप्त केल्या आहेत. गुन्हे शाखेने ही कारवाई अम्रपाली हॉटेल जवळ असलेल्या सार्वजनिक रोडवर केली. आरोपीला अटक करुन पुण्यातील (Pune Crime) 6 गुन्हे उघडकीस आणले आहेत.

 

अक्षय मारुती कापडी Akshay Maruti Kapdi (वय-22 रा. मु. पारगाव शिंगवे, पोस्ट अवसरी बु. ता. आंबेगाव) असे अटक (Arrest) करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. अटक केलेल्या आरोपीने स्वारगेट (Swargate Police Station), भारती विद्यापीठ (bharati vidyapeeth police station), दत्तवाडी (Dattawadi Police Station), कोथरुड (Kothrud Police Station), वारजे माळवाडी पोलीस ठाण्याच्या (Warje Malwadi Police Station) हद्दीत चोरल्या आहेत. पोलिसांनी दुचाकी जप्त करुन 6 गुन्हे उघडकीस आणले आहेत.

 

गुन्हे शाखा युनिट तीनचे पथक वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात पेट्रोलींग करत असताना पोलीस शिपाई ज्ञानेश्वर चित्ते (Dnyaneshwar Chitte) यांना बातमीदारामार्फेत आणि पोलिस शिपाई संजीव कळंबे (Sanjeev Kalambe) यांनी केलेल्या तांत्रिक विश्लेषणावरुन आरोपीची माहिती मिळाली. आरोपी आम्रपाली हॉटेल शेजारी येथील महामार्गाच्या लगत असलेल्या सर्व्हिस रोडवर उभा असून त्याच्याकडे असलेली के.टी.एम दुचाकी (KTM two-wheeler) कर्वेनगर (Karve Nagar) यथून चोरली असल्याची माहिती मिळाली. (Pune Crime)

मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतले. त्याच्याकडे असलेली के.टी.एम. दुचाकी जप्त करुन गुन्ह्यात अटक केली. त्याला न्यायालयात हजर करुन त्याची पोलीस कोठडी घेऊन सखोल चौकशी केली. चौकशीदरम्यान त्याने पुणे शहरातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दुचाकी चोरल्याचे निष्पन्न झाले. आरोपीकडून तीन लाख रुपयांच्या 6 दुचाकी जप्त केल्या.

 

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), सह पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (Joint CP Dr Ravindra Shisve),
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale), पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge),
सहायक पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे (ACP Laxman Borate)
यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन (Senior Police Inspector Abhay Mahajan),
पोलीस उप निरीक्षक दत्तात्रय काळे (PSI Dattatraya Kale), पोलीस अंमलदार महेश निंबाळकर, संतोष क्षिरसागर,
राजेंद्र मारणे, रामदास गोणते, विल्सन डिसोझा, सुजीत पवार, कल्पेश बनसोडे, संजीप कांबळे, ज्ञानेश्वर चित्ते, प्रकाश कट्टे,
दिपक क्षिरसागर, राकेश टेकावडे, सोनम नेवसे, भाग्यश्री वाघमारे यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Pune Crime | two-wheeler thief, 7 bikes seized from criminal pune police Crime Branch

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Omicron Variant in Maharashtra | ‘जिनोम सिक्वेन्सिंगच्या लॅब वाढवणार’; मुलांच्या लसीकरणाबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले…

Nawab Malik | समीर वानखेडे चैत्यभूमीवर पहिल्यांदा दिसले, नमाजाला मात्र नियमित दिसायचे; नवाब मलिकांचा वानखेडेंवर निशाणा

EPFO | 7 लाखापर्यंत EDLI Scheme मध्ये मिळतो लाभ, जाणून घ्या कोण कसे करू शकतात क्लेम

Must Read
Related News