Pune Crime | येरवड्यातील लक्ष्मीनगरमध्ये दुचाक्या पेटविल्या, दोन लाखांचे नुकसान

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | येरवडा येथील लक्ष्मीनगरमधील (Laxminagar Yerawada) एका सोसायटीच्या पार्किंगमध्ये पार्क केलेल्या दुचाकींना आग (Two-wheeler Fire) लावून पेटवून देण्याचा प्रकार समोर आला आहे. या आगीत चार दुचाकीचे 1 लाख 90 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. (Pune Crime)

 

याप्रकरणी अमित दिगंबरराव सिंधीकुमटे Amit Digambarrao Sindhikumte (वय 30, रा. देवी अपार्टमेंट, लक्ष्मीनगर, येरवडा) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात (Yerwada Police Station) फिर्याद दिली आहे. ही घटना शनिवारी सकाळी पावणेदहा ते साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली. (Pune Crime)

 

याबाबत पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी यांच्या राहत्या बिल्डिंगचे पार्किंगमध्ये त्यांची व इतरांच्या दुचाकी पार्क केल्या होत्या. कोणीतरी फिर्यादीच्या दुचाकीला आग लावली. या आगीत त्यांच्या दुचाकीबरोबरच इतर 3 दुचाकी जळून खाक होऊन 1 लाख 90 हजार रुपयांचे नुकसान झाले. आग लावण्यामागील कारणे अद्याप उघड झाले नसून सहायक पोलीस फौजदार सुर्वे (API Survey) तपास करीत आहेत.

 

 

Web Title :- Pune Crime | Two wheelers set on fire in Laxminarayan Yerwada causing loss of Rs 2 lakh

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा