Pune Crime | पुण्याच्या रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून कोटयावधीचं सोनं चोरणार्‍या 2 महिला अन् लहान मुलगा CCTV मध्ये कैद, पाहा व्हिडीओ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पुण्यातील रविवार पेठेतील (Raviwar Peth) ज्वेलर्सच्या दुकानात मुंबईहून (Mumbai) दागिने विक्रीसाठी आलेल्या व्यावसायिकाकडील तब्बल 1 कोटी 20 लाख रूपये किंमतीचे सुमारे 3 किलो सोन्याचे दागने लहान मुलासह दोन महिलांनी लांबविले आहेत. ही घटना आज (शनिवार) दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास रविवार पेठेतील राजमल माणिकचंद आणि कं. ज्वेलर्स सराफ दुकानात घडली. या घटनेमुळे प्रचंड खळबळ उडाली असून पोलिस प्रकरणाचा युध्दपातळीवर तपास (Pune Crime) करीत असताना त्यांना सीसीटीव्ही फुटेज मिळाले आहे. पोलिस सीसीटीव्ही फुटेजवरून (cctv footage) त्या महिलांचा शोध घेत आहेत.

जिग्नेश नरेश बोराणा (33, रा. घाटकोपर, मुंबई) यांनी फरासखाना पोलिस ठाण्यात (faraskhana police station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी घटनेची खातरजमा करून गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांचा तपास सुरू आहे. दरम्यान, प्राप्त झालेल्या माहितीनुसार, बोराणा आणि मुकेश चौधरी हे मुंबईहून पुण्यात दागिने विक्रीसाठी आले होते. ते रविवार पेठेतील एका ज्वेलर्सच्या (jewellery shops) दुकानात गेले. दरम्यान, त्यांच्याकडे एक दागिन्यांची पेटी होती. त्यामध्ये सुमारे 1 कोटी 20 लाख रूपये किंमतीचे 3 किलो वजनाचे सोन्याचे दागिने होते. लहान मुलगा आणि दोन महिलांनी ती सोन्याचे दागिने असलेली पेटी पळवली. बोराणा यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांची भंबेरी उडाली. दरम्यान, फिर्याद दाखल करण्यात आली असून गुन्हयाचा तपास फरासखाना पोलिस करीत आहेत. गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) अधिकार्‍यांनी देखील घटनास्थळी भेट दिली आहे. पोलिसांना सीसीटीव्ही फुटेज मिळाले आहे. पोलिस सीसीटीव्ही फुटेजवरून (cctv footage) त्या महिलांचा शोध घेत आहेत.

घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू असल्याची सांगण्यात आले आहे.
गणेश विसर्जनचा बंदोबस्त सर्वत्र तैनात करण्यात आला आहे.
त्यामुळे पोलिस यंत्रणेवर प्रचंड ताण आहे.
तपासाबाबत वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी सुचना दिल्या आहेत.

Web Titel :- Pune Crime | Two women and a boy arrested for stealing crores of gold from a jeweler’s shop in Raviwar Peth, Pune, captured on CCTV, watch the video

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Punjab New CM | …म्हणून अंबिका सोनींनी नाकारली सोनिया गांधींकडून आलेली पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाची ‘ऑफर’

Pitru Paksha 2021 | उद्यापासून श्राद्धपक्ष सुरू होईल, 16 दिवसापर्यंत चुकूनही करू नका ‘ही’ कामे; जाणून घ्या

Pune Corporation | पुण्याच्या सिंहगड रस्त्यावरील 120 कोटी रुपयांच्या उड्डाणपुलाची ‘वर्क ऑर्डर’ अडकून पडली; महापालिका वर्तुळात ‘उलट सुलट’ चर्चा