Pune Crime | दुर्दैवी! रक्षाबंधनासाठी फार्महाऊसवर आलेल्या 2 वर्षाच्या चिमुकलीचा पाण्यात बुडून मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | फार्महाऊसवर रक्षाबंधन (Rakshabandhan) साजरा करण्यासाठी आलेल्या दोन वर्षाच्या चिमुकलीचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू (Death) झाल्याची घटना रविवारी (दि.14) दुपारी तीनच्या सुमारास कोरेगाव मूळ येथे घडली आहे. पुण्यातील (Pune Crime) मार्केट यार्ड परिसरातील व्यापाऱ्याच्या एकुलत्या एक लहान मुलीचा बुडून मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. कनक वर्धमान कोठारी Kanak Vardhaman Kothari (वय-2 वर्षे) असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे.

 

वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी (Senior Police Inspector Rajendra Mokashi) यांनी दिलेल्या माहितीनुसार, वर्धमान कोठारी हे आपल्या पत्नी काजल, मुलगी कनक, बहिण व इतर नातेवाईक असे एकूण 25 ते 30 जण रक्षाबंधनाचा कार्यक्रमासाठी उरुळी कांचन (Uruli Kanchan) परिसरातील कोरेगाव मूळ येथील नेचर नेस्ट अॅग्रो टुरिझम (Nature Nest Agro Tourism) या फार्महाऊसवर सकाळी नऊच्या सुमारास आले होते. (Pune Crime)

रक्षाबंधन आणि इतर कार्यक्रम दुपारी अडीच पर्यंत झाले. त्यानंतर सर्वजण जेवण करत असताना
कनक आत्याच्या लहान मुलांसोबत खेळत होती. काही वेळानंतर सर्व मुले परतली.
मात्र कनक आली नाही. त्यामुळे सर्वांनी तिचा शोध घेतला.
त्यावेळी फार्महाऊसच्या लहान पुलाच्या पाण्यात कनक पडल्याचे आढळून आले.
तिला पाण्यातून बाहेर काढून तात्काळ लोणी स्टेशन येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
मात्र डॉक्टरांनी तपासून तिला मृत्यू झाल्याचे सांगितले.

 

Web Title :- Pune Crime | two year old girl who came for rakshabandhan drowned in water in koregaon pune district

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा