Pune Crime | सोशल मीडीयाचा वापर केला मेफेड्रोन व चरस विक्रीसाठी, दोन तरुणांना गुन्हे शाखेकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | सोशल मीडियाचा वापर करुन मेफेड्रोन Mephedrone (एमडी) आणि चरस (Hashish) या अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या दोघांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) अंमली पदार्थ विरोधी पथक एकने (Anti Narcotics Cell) अटक केली आहे. आरोपीकडून 2 लाख 14 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे. पोलिसांनी (Pune Police) आरोपीविरुद्ध सिंहगड रोड पोलीस ठाण्यात (Sinhagad Road Police Station) एन.डी.पी.एस. अॅक्ट (N.D.P.S. Act) कायद्यानुसार गुन्हा दाखल (Pune Crime) केला आहे.

 

आकाश महेंद्र ठाकर Akash Mahendra Thacker (वय-22 रा. सनसिटी, आनंदनगर, हिंगणे), अनिकेत जनार्दन धांडेकर Aniket Janardan Dhandekar (वय-20 रा. आनंद विहार कॉलनी, सिंहगड रोड, हिंगणे खुर्द) अशी अटक (Arrest) करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी ही कारवाई अखिल ओमकार मित्र मंडळ गणेश मंदिरासमोरील सार्वजनिक रोडवर शनिवारी (दि.19) केली. (Pune Crime)

 

अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी सिहगड रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलींग करत होते. त्यावेळी अखिल ओमकार मित्र मंडळ गणेश मंदिरासमोरील सार्वजनिक रोडवर दोन जण अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी थांबले असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. आरोपी आकाश ठकर याच्याकडून 47 हजार 650 रुपये किमतीचे 47 ग्रॅम 650 मिलीग्रॅम चरस, मोबाईल, दुचाकी असा एकूण 77 हजार 650 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तर अनिकेत धांडेकर याच्याकडून 86 हजार 400 रुपये किमतीचे 5 ग्रॅम 760 मिलीग्रॅम मेफेड्रॉन जप्त केले. अंमली पदार्थ दोन अज्ञात व्यक्तीकडून विकत घेऊन त्याची पुणे शहरात विक्री करणार असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), पोलीस सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik), अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale), पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे (DCP Amol Zende),
सहायक पोलीस आयुक्त गुन्हे 1 गजानन टोम्पे (ACP Gajanan Tompe)
यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड (Senior Police Inspector Vinayak Gaikwad),
सहायक पोलीस निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे (API Laxman Dhengale),
शैलजा जानकर (API Shailaja Jankar), पोलीस अंमलदार सुजित वाडेकर, मनोजकुमार साळुंके,
विशाल दळवी, पांडुरंग पवार, संदिप शिर्के, राहुल जोशी, प्रविण उत्तेकर, मारुती पारधी,
सचिन माळवे, संदेश काकडे, रेहाना शेख, नितेस जाधव, योगेश मोहिते यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Pune Crime | Two youths arrested by Crime Branch for using social media to sell mephedrone and hashish

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा