Pune Crime | दुर्देवी ! कामशेतमध्ये विजेचा धक्का लागून दोन तरूणाचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  Pune Crime | कामशेत येथील उकसान पठारावरील मेंढीमाळात महावितरणच्या विजेचा शाॅक (Electric shock) बसून (Pune Crime) एक विद्यार्थी आणि एक तरुण जागीच ठार झाले आहेत. अविनाश खेमाजी बगाड (वय, 16) व रविंद्र सिताराम बगाड (वय, 23) हे (दोघे रा. शिरदे ता. मावळ) असं मृत्यू मुखी पडलेल्या तरुणांची नावे आहेत. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत लहू भरत बगाड (Lahu Bharat Bagad) यांनी पोलिसांत माहिती दिली आहे.

याबाबत माहिती अशी, लहू बगाड, जयदास बगाड, समीर बगाड, अजय बजाड, साईनाथ बगाड, अविनाश बगाड, रविंद्र बगाड असे 7 जण सोमवारी रात्री बैल शोधायला उकसान पठार मेढीमाळावर गेले होते. त्यातील अविनाश बगाड (Avinash Bagad) व रविंद्र बगाड (Ravindra Bagad) यांचा दुर्देवी मृत्यु झाला आहे.
अविनाश बगाड हा वडेश्वरच्या शासकीय आश्रम शाळेत 10 वीत शिकत होता. रविंद्रच्या मागे आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.

यांना विजेचा धक्का बसला याबाबत माहिती समजताच शिरदे ग्रामस्थांनी रात्रीच्या अंधारात सह्याद्रीच्या पठारावरील मेंढीमाळ गाठला.
दोघांच्या आई वडीलांनी हंबरडा फोडला. त्यांचा आक्रोश पाहून गाव सारा हळहळतोय.
यानंतर कामशेत पोलीसांनी (Kamshet police) घटनास्थळी भेट देऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी तळेगाव दाभाडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल (Pune Crime) करण्यात आले.

 

Web Title : Pune Crime | Unfortunate! Two youths killed in lightning strike in Kamshet of pune district

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Multibagger Stock | 1 रुपया 55 पैशांचा शेयर 301.60 रुपयांचा झाला ! 1 लाखाचे केले 1.97 कोटी रुपये, तुमच्याकडे आहे का हा Stock?

Pune Crime | पुण्यात सपासप वार करुन तरूणाचा खून झालेल्या गुन्ह्याचा ओल्या अंडरवेअरमुळे ‘पर्दाफाश’; जाणून घ्या प्रकरण

Sharvari Wagh | महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांची नात ‘शर्वरी’ करतेय विकी कौशलचा भाऊ ‘सनी’ला डेट?