Pune Crime | दुर्दैवी ! पुणे-सोलापूर रस्त्यावरील अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू; तिघे गंभीर जखमी तर ड्रायव्हर फरार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पुणे-सोलापूर रस्त्यावर (Pune-Solapur Highway) कुरकुंभ परिसरात (Krukumbh) रस्ता ओलांडताना झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याची घटना दुर्देवी घटना शनिवारी सायंकाळी घडली आहे. अपघातात तिघेजण गंभीर जखमी (Pune Crime) झाले आहेत. त्यामुळे परिसरात मयतांच्या कुटुंबियांना एक मोठा धक्का बसला आहे. अपघातानंतर पसार झालेल्या वाहनचालकाचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती दौंड पोलिसांनी (Daund Police Station) दिली आहे.

सुखराज गौतम (वय 35), छोटू मनू गौतम (वय 5), मुकेश फकीर गौतम (वय 11) अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. अपघातात जिलेराम मोहन मोद (वय 40), रिकी मनू गौतम (वय 9), संतोष जिलेराम मोद (वय 10) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. जखमींवर दौंडमधील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. पसार झालेल्या ड्रायव्हरचा शोध‌ घेण्यात येत असल्याचे दौंड पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद घुगे (Police Inspector Vinod Ghuge) यांनी सांगितले आहे. गौतम कुटुंबीय मूळचे उत्तरप्रदेशामधील आहे. कुरकुंभ परिसरात नातेवाईकांना भेटण्यासाठी ते सर्वजण आले होते. आज म्हणजेच शनिवारी (27 नोव्हेंबर) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास सर्वजण रस्ता ओलांडत होते. त्या वेळी सोलापूरकडे जाणाऱ्या भरधाव वाहनाने गौतम, आणि इतरांना यांना धडक दिली. अपघाताचा आवाज ऐकून ग्रामस्थ तसेच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना रूग्णालयात दाखल करण्यात आले (Pune Crime). उपचारांपूर्वीच सुखराज गौतम, छोटू गौतम, मुकेश गौतम यांचा मृत्यू झाला. पोलीस उपनिरीक्षक सुशील लोंढे (PSI Sushil Londhe) तपास करत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Unfortunately! Three members of the same family killed in Pune-Solapur road accident near krukumbh; Three seriously injured while driver absconding daund police station search driver

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Digital Payment | WhatsApp च्या ‘विजया’ मुळं आता PhonePe, Google Pay ला मोठी टक्कर ! 4 कोटी युजर्सची लिमिट वाढणार, जाणून घ्या कोणाला होणार फायदा

Bhaiyyu Maharaj Suicide Case | भय्यू महाराज आत्महत्या प्रकरणात नवीन खुलासा; ब्लॅकमेल करणाऱ्या तरुणीचं ‘Whatsapp chat’ आलं समोर

Modi Government | दरमहिना होईल 1 लाखाची कमाई ! 2 लाख रुपयात सुरू करा ‘हा’ व्यवसाय, मोदी सरकार देईल 4 लाख रुपये