Pune Crime | स्पीड ब्रेकरवर दाबला अर्जंट ब्रेक, ज्येष्ठ नागरिकाचे कमरेचे हाड झाले फ्रॅक्चर; पुण्यात बसचालकाविरुद्ध दाखल झाला गुन्हा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | सातारा रोडवरील (Pune-Satara Road) स्पीड ब्रेकरवरुन जाताना अचानक अर्जंट ब्रेक दाबल्याने बसमधील प्रवासी बसमध्ये आदळून पडल्याने त्यांचे कमेरेच हाड फ्रॅक्चर झाल्याचा प्रकार समोर (Pune Crime) आला आहे. याप्रकरणी कृष्णा हनमंतराव बबलादी (वय ५६, रा. मोरवाडी, पिंपरी) यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात (Sahakar Nagar Police Station) फिर्याद दिली आहे.

 

सहकारनगर पोलिसांनी ट्रॅव्हल बसचालकावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना सातारा रोडवरील राव नर्सिंग होमसमोर २१ डिसेबर रोजी सकाळी ६ वाजता घडली होती.

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या एस टीचा संप असल्याने खासगी ट्रॅव्हल बसना प्रवासी घेऊन जाण्यास परवानगी दिली आहे.
फिर्यादी हे खासगी बसने जात होते. यावेळी बसचालक वेगाने वेडीवाकडी बस चालत होता.
राव नर्सिंग होमसमोर स्पीड ब्रेकरचा त्याला अगोदर अंदाज आला नाही.
त्याने स्पीड ब्रेकरवर बस आली असताना अर्जंट ब्रेक दाबला.
त्यामुळे फिर्यादींचा तोल गेला. ते बसमध्ये आदळून खाली पडले.
त्यात त्यांच्या कमरेचे हाड फ्रॅक्चर झाले. त्यावर त्यांनी उपचार घेतल्यानंतर आता पोलिसांकडे फिर्याद (Pune Crime) दिली आहे.
पोलीस हवालदार गायकवाड तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Urgent brake pressed on speed breaker senior citizens lumbar bone fractured A case has been registered against a bus driver in Pune

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा