Pune Crime | वानवडी परिसरातील ‘दआरोमा स्पा’मधील घुसून तोडफोड, 2 महिलांसह चौघांविरूध्द गुन्हा

पुणे : Pune Crime | ‘द आरोमा स्पा’ या वानवडीतील (the aroma spa, wanwadi) स्पा सेंटरमध्ये नेमलेल्या मॅनेजरच्या ओळखीच्या लोकांनी स्पाचे कुलूप तोडून आतील सामानाची तोडफोड करुन काऊंटरमधील २७ हजार ७८० रुपये जबरदस्तीने चोरुन नेल्याचा प्रकार समोर (Pune Crime) आला आहे.

या प्रकरणी वानवडी पोलिसांनी (Wanwadi Police) निकीता निनाद नाईक (वय २९, रा. विक्रांत आर्केड, आंबेगाव बु़), तन्वी संजय पोटे (वय २६, रा. उंड्री गाव), सिद्धार्थ राजेंद्र हरके (वय २९) आणि अब्दुल अलहदी मसुद अहमद (रा. उंड्री गाव) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी युवराज आनंत पाटील (वय ३२, रा. मल्हार कॉलनी, मांजरी बु़ ) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार १४ ऑगस्ट रोजी पहाटे चार ते साडेपाच वाजेच्या दरम्यान घडला होता.

युवराज पाटील यांचे वानवडीमधील केदारीनगर येथील रविराज बिल्डींगमध्ये द आरोमा स्पा हे स्पा सेंटर आहे. स्पा सेंटरच्या मॅनेजर पूजा सिंग आहेत. त्यांच्या ओळखीच्या आरोपींनी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास स्पाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. आतील वुडन डोअर, ग्लास डोअर, काऊंटर, टेबल बाथरुम दरवाजा, कमोड, फ्लॅश, दोन्ही रुममधील आरसे यांची तोडफोड केली. कॉस्मेटीक मटेरीअल आतून दिले. दुकानाचे काऊंटर तोडून सुमोर १ लाख ७५ हजार रुपयांचे नुकसान केले. काऊंटरमधील २७ हजार ७८० रुपये चोरुन नेले. पोलीस उपनिरीक्षक मोहिते तपास करीत आहेत.

हे देखील वाचा

Malicious Apps | सावधान ! तात्काळ आपल्या फोनमधून DELETE करा ‘हे’ 8 अ‍ॅप, Google ने केले बॅन; जाणून घ्या लिस्ट

Olympian Footballer | ऑलम्पियन फुटबॉलर एस.एस. हकीम यांचे निधन, 82 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Pune Corona | पुण्यात गेल्या 24 तासात कोरोनाचे 197 नवे रूग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

ट्विटर ला देखील फॉलो करा

 

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Pune Crime | Vandalism at Daroma Spa in Wanwadi area, crime against four including 2 women

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update