Pune Crime | वीजपुरवठा खंडित केल्याच्या रागातून महावितरण कार्यालयाची तोडफोड, कोंढव्यातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | जानेवारीपासून वीजबिलाची थकबाकी असल्याने नियमानुसार वीजपुरवठा खंडित (Power Outage) केला. विजपुरवठा खंडीत केल्याच्या रागातून महावितरणच्या कोंढवा शाखा (MSEDCL Kondhwa Branch) कार्यालयात तोडफोड (Office Vandalism) करुन कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी जितेंद्र दिनकर साळवी (Jitendra Dinkar Salvi) विरुद्ध कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) IPC 353, 323, 504, 506, 427 नुसार गुन्हा (FIR) दाखल (Pune Crime) करण्यात आला.

 

याप्रकरणी महावितरणचे वरिष्ठ तंत्रज्ञ निवास मारुती आळवेकर Nivas Maruti Alvekar (वय-42 रा. येवलेवाडी, पुणे) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार मंगळवारी (दि.24) दुपारी साडेतीनच्या सुमारास कोंढवा येथील सोमजी चौकातील महावितरण कार्यालयात घडला. (Pune Crime)

 

याबाबत माहिती अशी की, महावितरणच्या रास्ता पेठ विभागाच्या (Rasta Peth Division) कोंढवा शाखा कार्यालय अंतर्गत कोंढवा बुद्रुक (Kondhwa Budruk) येथील वीजग्राहक दिनकर साळवे यांच्याकडे वीजबिलापोटी 27 जानेवारी 22 पासून 6 हजार 396 रुपयांची थकबाकी आहे.
त्यामुळे त्यांच्याकडील वीजपुरवठा महावितरणकडून मंगळवारी (दि. 24) सकाळी 11 वाजता खंडित करण्यात आला.
त्यानंतर दुपारी 3.30 च्या सुमारास कोंढवा शाखा कार्यालयात वीजपुरवठा खंडित करता काय म्हणून एका व्यक्तीने कर्मचाऱ्यांना शिवीगाळ (Abusive) सुरु केली.
स्वतःचे नाव जितेंद्र दिनकर साळवी असे सांगत त्याने कार्यालयात तोडफोड केली. टेबलवरील रजिस्टर फेकून दिले.
त्यानंतर वरिष्ठ तंत्रज्ञ निवास आळवेकर यांना ढकलून दिले. पुढील तपास कोंढवा पोलीस करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Vandalism of MSEDCL office due to power outage, incident in Kondhwa

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Jayant Patil | ‘छगन भुजबळ ओबीसी आरक्षणाबद्दल जे बोलतात ते जनतेपर्यंत पोहोचवा…’, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे कार्यकर्त्यांना आदेश

 

SSY And PPF | सुकन्या समृद्धी आणि PPF वाल्यांसाठी खुशखबर, सरकार घेणार आहे हा मोठा निर्णय!

 

Income Tax Rule | 26 मे पासून इन्कम टॅक्सच्या नियमात होत आहे मोठा बदल, जाणून घ्या अन्यथा येऊ शकता अडचणीत