Pune Crime | हॉटेलमध्ये राडा घालत केली गाड्यांची तोडफोड; वारजे परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | हॉटेलमध्ये जेवणासाठी आलेल्या ग्राहकाला कोयत्याचा धाक दाखवून जबरदस्तीने पैसे काढून घेत टोळक्याने गोंधळ घातला. तसेच परिसरातील सोसायट्यांमधील गाड्यांची तोडफोड (Vandalism of Vehicles) करून परिसरात दहशत निर्माण केली. ही घटना (Pune Crime) वारजे परिसरातील गणपती माथा येथील एका हॉटेलमध्ये व परिसरात शनिवारी (दि. 10) रात्री साडेअकराच्या सुमारास घडली. याप्रकरणी चार जणांवर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

 

रोहित जटल, अवि (पूर्ण नाव पत्ता माहीत नाही) व त्यांच्या इतर दोन साथीदारांवर वारजे पोलीस ठाण्यात (Warje Police Station) आयपीसी 392, 323, 504, 506(2) महाराष्ट्र पोलीस कायदा (Maharashtra Police Act), आर्म अॅक्ट (Arm Act) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत राजकुमार आनंद मोरे (वय 39, रा. गोकुळनगर पठार, वारजे) यांनी रविवारी (दि.11) फिर्याद दिली आहे. (Pune Crime)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे गणपती माथा येथील एका हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले होते. जेवण झाल्यानंतर हॉटेलच्या मॅनेजरला बिल देताना ते मॅनेजरसोबत बोलत होते. त्यावेळी फिर्यादी बसलेल्या टेबल जवळून जाणाऱ्या रोहित जटल याने आपल्याला बोलल्याचा गैरसमज करून घेतला. त्याने त्याच्या इतर तीन साथीदारांना बोलावून घेतले. आरोपीने फिर्यादी यांच्या कानाखाली मारून अवि याने कोयता काढून फिर्यादी यांना शिवीगाळ केली. तसेच त्याने कोयत्याचा धाक दाखवून फिर्यादी यांच्याकडे पैशांची मागणी केली.

फिर्यादी यांनी पैसे देण्यास नकार दिला असता आरोपी रोहित याच्या इतर साथीदारांनी जबरदस्तीने फिर्यादी यांच्या खिशातील 700 रुपये काढून घेतले.
तसेच हॉटेल मॅनेजर, कामगार व हॉटेलमधील इतर नागरिकांना कोयत्याचा धाक दाखवून गोंधळ घालत निघून गेले.
हॉटेलमधून जाताना आरोपींनी परिसरातील सोसायट्यांमध्ये पार्क केलेल्या गाड्यांची तोडफोड करून परिसरात दहशत माजवली.
घटनेची माहिती मिळताच वारजे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पुढील तपास वारजे पोलीस करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | vandalized cars in hotel; Incidents in Warje area

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Congress | सोनिया गांधी यांचा वाढदिवस वृद्धांसोबत केक कापून साजरा

PM Kisan | PM किसानच्या १३ व्या हप्त्यापूर्वी मोठी अपडेट, केंद्रीय कृषिमंत्र्यांनी दिली ‘ही’ माहिती

Ajit Pawar | शाई फेकली म्हणून खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा; राज्यपाल आणि भाजपच्या नेत्यांवर अद्याप गुन्हा का नाही? – अजित पवार