Pune Crime | फरार असताना रवींद्र बऱ्हाटेने वापरलेली वाहने व मोबाईल पोलिसांकडून जप्त; पोलिस कोठडीत वाढ, बऱ्हाटेला आश्रय देणारा फरार

पुणे न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  Pune Crime | अटक टाळण्यासाठी फरार झालेला माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बऱ्हाटे (rti activist ravindra barate) याला आळंदीतील सागर म्हस्के (Sagar Mhaske) याने त्याचा घरी आश्रय दिला होता. बऱ्हाटेला अटक झाल्यापासून तो फरार आहे. तर फरार असताना रवींद्र बऱ्हाटेने वापरलेली तीन वाहने आणि मोबाईल पोलिसांनी केली जप्त केला आहेत. Pune Crime | Vehicles and mobiles used by Ravindra Barhate while absconding were seized by the police; Increase in police custody, fugitive sheltering Barhate

पोलिस कोठडीची मुदत संपत असल्याने शुक्रवारी बऱ्हाटे न्यायालयात हजर करण्यात आले होते.
गुन्ह्याच्या पुढील तपासासाठी न्यायालयाने बऱ्हाटेला २० जुलैपर्यंत पोलिस कोठडी (Police custody) सुनावली आहे. विशेष मोक्का न्यायाधीश एस. आर. नावंदर (Special Mocca Judge S. R. Navander) यांनी हा आदेश दिला.

बऱ्हाटेला अटक (ravindra barate arrest) झाल्यानंतर म्हस्के हा फरार आहे.
पोलिस त्याचा बऱ्हाटेच्या मदतीने शोध घेत आहेत. तसेच बऱ्हाटेने फरार काळात असलेल्या दोन दुचाकी आणि एक चारचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहेत.
त्यातील कार ही बऱ्हाटे याची पत्नी संगिता हिच्या नावावर आहे.
तर एक दुचाकी या प्रकरणातील फिर्यादी यांचा विश्‍वासघात करून ताब्यात घेतलेली आहे. तसेच तीन सीमकार्ड आणि एक फोन देखील पोलिसांनी त्याकडून हस्तगत केला आहे.
तसेच फेसबरवर टाकलेल्या क्लीप बऱ्हाटे याने स्वतः तयार केल्या होत्या.
त्या सर्व ठिकाणांची पोलिसांनी पंचनामा केला आहे.
अशी माहिती या प्रकरणातील विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण (Adv. Praveen Chavan) यांनी न्यायालयास दिली.

म्हस्के याचा शोध घेण्यासाठी, या गुन्ह्यातील सह आरोपी विशाल ढेरे याच्याकडून या गुन्ह्यात सहभागी होण्यासाठी बऱ्हाटेने किती मोबदला घेतला याचा तपास करण्यासाठी, अटक टाळण्यासाठी बऱ्हाटेला आणखी कोणी मदत केली? त्याला अन्न, वस्त्र, निवारा, पैसे, औषधे, वैद्यकीय उपचार, प्रवासाची साधणे, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, आर्थिक मदत व साहाय्य कोणी व कशा प्रकार केले? ही मदत कोठून पुरविण्यात आली? याचा तपास करण्यासाठी बऱ्हाटेच्या पोलिस कोठडीत वाढ करण्याची मागणी ॲड. चव्हाण यांनी केली.
गुन्ह्याचा तपास सहायक पोलिस आयुक्त सुरेंद्र देशमुख (Assistant Commissioner of Police Surendra Deshmukh) करीत आहेत.

Web Title : Pune Crime | Vehicles and mobiles used by Ravindra Barate while absconding were seized by the police; Increase in police custody, fugitive sheltering Barate

Join our Whatsapp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

Ramdas Athawale | ‘राजकीय नुकसान टाळण्यासाठी शिवसेनेने भाजपसोबत यावे’ : रामदास आठवले

Lonavla News | लोणावळ्यात जमावबंदी ! धबधब्यापासून 1 किमी परिसरात वाहनांना बंदी, ‘या’ पर्यटन स्थळांवर नियम लागू

Hairs Of Children | मुंडण केल्याने खरोखरच मुलांचे केस दाट व काळे होतात का?, जाणून घ्या