Pune Crime | ‘आम्ही कात्रजचे भाई आहोत’, पुण्यात भरदिवसा टोळक्याचा धुडगूस, कात्रज चौकातील गाड्यांची केली तोडफोड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | कात्रज (Katraj) ते मुंबई (Mumbai) प्रवासी (Passenger) वाहतूक करायची असेल तर महिन्याला दहा हजार रुपये हप्ता (Instalment) द्यावा लागेल, आम्ही कात्रजचे भाई आहोत असे म्हणत हप्ता देण्यास नकार देणाऱ्या चालकाच्या गाडीची तोडफोड (Pune Crime) केली. भरदिवसा कात्रज चौकात (Katraj Chowk) घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. हा प्रकार मुंबई-पुणे महामार्गावरील (Mumbai-Pune Highway) ICICI बँकेसमोर घडला. याबाबत पोलिसांनी (Pune Police) तिघांविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल केला आहे.

इस्माईल मकानदार, तौशीफ उर्फ चुहा आणि त्याचा आणखी एक साथीदार यांनी गाड्यांची तोडफोड (Vehicles Vandalized) केली. त्यांच्या विरुद्ध भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharati Vidyapeeth Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत कारचालक प्रवीण दिनकर गायकवाड (Praveen Dinkar Gaikwad) यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार गुरुवारी (दि.7) दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडला. महत्वाचे म्हणजे पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर हा प्रकार घडला आहे. त्यामुळे पोलिसांचा गुन्हेगारांवर (Criminals) वचक राहिला आहे की नाही असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे. (Pune Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई-पुणे महामार्गावर फिर्यादी हे ईरटीका कार (Ertica Car) घेऊन प्रवासी वाहतूक करण्यासाठी नंबरला थांबले होते. त्यावेळी आरोपी हातात लाकडी बांबू घेऊन त्यांच्याजवळ आले. आम्ही कात्रजचे भाई आहोत, तुम्ही आमच्या परवानगीशिवाय प्रवासी वाहतूक कशी करता. जर तुम्हाला कात्रज ते मुंबई प्रवासी वाहतूक करायची असेल तर महिन्याला दहा हजार रुपये हप्ता द्यावा लागेल, अशी मागणी केली.

फिर्यादी यांनी हप्ता देण्यास नकार दिला असता फिर्यादी व त्यांच्या मित्रांना आरोपींनी शिवीगाळ केली.
तसेच हातातील लाकडी बांबूने इरटीका कारच्या काचा फोडून 40 हजार रुपयांचे नुकसान करुन फिर्यादी यांना जीवे ठार मारण्याची धमकी (Threats to Kill) दिली.
पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Web Title : Pune Crime | vehicles vandalized at katraj chowk in pune

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Gold Silver Price Today | सोन्याच्या किंमतीत किंचित वाढ तर, चांदी वधारली; जाणून घ्या लेटेस्ट रेट

 

Thackeray Government | ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! महाराष्ट्रात उभारले जाणार सौरऊर्जा पार्क

 

Digital-Social Media Training Camp Pune | आगामी निवडणुकीत ‘डिजिटल कार्यकर्त्यां’मुळे मिळेल नवसंजीवनी; रविवारी पुण्यात डिजिटल कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर