Pune Crime | पुण्यात गाड्यांची तोडफोड, टोळक्याचा कोयते हातात घेऊन नऱ्हे परिसरात ‘राडा’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यातील (Pune Crime) सिंहगड रोड परिसरात काही जणांनी चारचाकी गाड्यांची तोडफोड केली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी दहशत पसरली असून मारुती थोरात (पूर्ण नाव पत्ता माहित नाही) याच्यासह चार ते पाच जणांवर सिंहगड रोड पोलीस ठाण्यात (Sinhagad Road Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना पुण्यातील (Pune Crime ) नऱ्हे येथील सिंहगड कॉलेज (Sinhagad College) परिसरात गुरुवारी (दि.2) रात्री पावणे आठच्या सुमारास घडली. आरोपींनी रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या 6 चारचाकी आणि एका रिक्षाची तोडफोड केली.

 

याप्रकरणी योगेश शहाजी जाधव (वय-25 रा. कृष्णाईकुंज, सिंहगड कॉलेज जवळ, नऱ्हे) यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या मित्रासोबत पार्कींगमध्ये गप्पा मारत होते. त्यावेळी आरोपी माऊली थोरात (Mauli Thorat) हा त्याच्या इतर चार ते पाच साथिदारांसह हातात कोयते, लाकडी दांडके घेऊन मोठमोठ्याने आरडाओरडा करत आला. टोळक्याने मोठमोठ्याने शिवीगाळ करत परिसरात दहशत (Pune Crime) माजवली.

आरोपींनी रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या चारचाकी आणि एका रिक्षाची तोडफोड केली. आरोपींनी फिर्यादी यांच्या गाडीच्या डिक्कीजवळ कोयत्याने मारुन गाडीचे नुकसान केले. फिर्यादी योगेश जाधव यांनी शुक्रवारी (दि.3) सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पुढील तपास सिंहगड रोड पोलीस करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Vehicles vandalized in Narhe area of pune sinhagad road police station

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Money Laundering Case | ‘हवाला’च्या माध्यमातून हाँगकाँगला पाठविले तब्बल 1100 काेटी रुपये; CA ला अटक

Omicron Covid Variant | 5 वर्षांपेक्षा लहान मुलांना टार्गेट करतोय ‘ओमिक्रॉन व्हेरिएंट’; डॉक्‍टरांचा दावा

Amitabh Bachchan | चित्रपटांमध्ये काम मिळत नव्हतं, KBC च्या सेटवर भावूक झाले ‘बिग बी’ अमिताभ, व्हिडीओ पाहून तुमच्या देखील डोळयात पाणी…

खुलेआम सुरू आहे बनावट Aadhaar Card बनवण्याच धंदा, 10 मिनिटात तयार करतात कॉपी; असे ओळखा बनावट आणि खरे

Multibagger Stock | ‘या’ 5 शेयरने गुंतवणुकदारांना बनवले लखपती, 5 वर्षात दिला 200% रिटर्न; तुमच्याकडे आहेत का हे stocks?

Multibagger Stock | 1 रुपयांपेक्षा कमी किमतीच्या ‘या’ स्टॉकने बदलले गुंतवणुकदारांचे नशीब, 1 लाख झाले रू. 65.06 लाख, तुमच्याकडे आहेत का?