Pune Crime | अंमली पदार्थीची विक्री करण्यासाठी आलेल्या सराईत गुन्हेगाराला विमानतळ पोलिसांकडून अटक, 1 कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पुण्यात अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी आलेल्या जळगाव येथील सराईत गुन्हेगाराला विमानतळ पोलिसांनी (Vimantal Police) सापळा रचून अटक (Arrest) केली. अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून तब्बल एक कोटींचे 714 ग्रॅम मेफेड्रोन Mephedrone (एमडी) हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. 28) विमाननगर येथील सिम्बॉयसिस कॉलेज (Symbiosis College) जवळ (Pune Crime) करण्यात आली.

 

अरविंद रविंद्र बिऱ्हाडे Arvind Ravindra Birhade (वय – 26 रा. राजे संभाजीनगर धान्य मार्केटच्या मागे अमळनेर, ता अमळनेर, जि. जळगाव- Jalgaon) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीवर विमानतळ पोलीस ठाण्यात (Vimantal Police Station) एन. डी. पी. एस. अ‍ॅक्ट (NDPS Act) नुसार गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime)

 

विमानतळ पोलीस ठाण्यातील तपास पथकाचे पोलीस नाईक सचिन जाधव (Police Naik Sachin Jadhav) यांना माहिती मिळाली की, सिम्बॉयसिस कॉलेज जवळ एक जण अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी येणार आहे. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून अरविंद बिऱ्हाडे याला ताब्यात घेतले त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे 1 कोटी 7 लाख 10 हजार रुपये किमतीचे 714 ग्रॅम एमडी ड्रग्ज आढळून आले. पोलिसांनी ड्रग्ज जप्त केले आहे. आरोपीने हे ड्रग्ज कोठून आणले याबाबत पोलीस तपास करीत आहेत. अरविंद बिऱ्हाडे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर अमळनेर पोलीस ठाण्यात (Amalner Police Station) खुनाचा प्रयत्न (Attempted Murder), बलात्कार (Rape), खंडणी (Extortion), जबरी चोरी (Theft) असे सात गंभीर गुन्हे दाखल आहे. खुनाच्या प्रयत्न करण्याच्या गुन्ह्यात तो फरार होता.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta),
सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग नामदेव चव्हाण (Addl CP Namdev Chavan),
पोलीस उपायुक्त परिमंडळ 4 रोहीदास पवार (DCP Rohidas Pawar),
सहायक पोलीस आयुक्त किशोर जाधव (Yerawada Division ACP Kishor Jadhav),
वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव (Senior Police Inspector Bharat Jadhav),
पोलीस निरीक्षक गुन्हे मंगेश जगताप ( Police Inspector Mangesh Jagtap)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रविंद्र ढावरे (PSI Ravindra Dhaware), पोलीस अंमलदार अविनाश शेवाळे, सचिन कदम, सचिन जाधव, प्रदिप मोटे, रुपेश पिसाळ, गिरीश नाणेकर, अंकुश जोगदंडे, संजय असवले यांच्या पथकाने केली.

 

 

Web Title : –  Pune Crime | viman nagar police arrest criminals who came to sell narcotics seized MD drugs worth 1 crore

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा