Pune Crime | दुचाकी चोरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला विमानतळ पोलिसांकडून अटक, 1 लाखांचा मुद्देमाल जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पुणे शहर आणि ग्रामीण (Pune Rural) भागात दुचाकी चोरणाऱ्या (Vehicle Thief) सराईत गुन्हेगाराला (Criminal) विमानतळ पोलिसांनी (Viman Nagar Police) अटक (Arrest) करुन चोरीच्या दुचाकी जप्त केल्या आहेत. पोलिसांनी आरोपीकडून एक लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई पुण्यातील (Pune Crime) लोहगाव (Lohegaon) येथे करण्यात आली. आकाश हरिश्चंद्र पायगुडे Akash Harishchandra Payagude (वय-21 रा. शिवमंदीराजवळ कलवडवस्ती, लोहगाव) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

 

विमानतळ पोलीस ठाण्याच्या (Viman Nagar Police Station) हद्दीत मागील काही दिवसांपासून वाहन चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. पोलीस ठाण्यातील तपास पथकाकडून (Investigation Team) वाहन चोरांचा शोध घेत असताना सर्व्हिलन्स (Surveillance) पोलीस अंमलदार उमेश धेंडे (Umesh Dhende) यांना एक सराईत वाहन चोर लोहगाव येथील कलवडवस्तीत फिरत असून त्याच्याकडे असलेली सी. डी. डिलक्स (C.D. Deluxe) गाडी चोरीची असल्याची माहिती मिळाली. (Pune Crime)

 

पोलिसांनी लोहगाव येथील कलवडवस्ती येथे शोध घेऊन आरोपीचा पाठलाग करुन ताब्यात घेतले. त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने पुणे ग्रामीण पोलिसांच्या (Pune Rural Police) राजगड पोलीस ठाण्याच्या (Rajgad Police Station) हद्दीतून आणखी एक दुचाकी चोरल्याची कबुली दिली. आरोपीवर यापूर्वी दुचाकी चोरीचे दोन गुन्हे दाखल आहेत. आरोपीकडून सी. डी. डिलक्स आणि व्हेस्पा मोपेड (Vespa Moped) या दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), पोलीस सह आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (Jt CP Dr Ravindra Shisve), अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशीक विभाग नामदेव चव्हाण (Addl CP Namdev Chavan), पोलीस उपायुक्त परिमंडळ 4 रोहीदास पवार (DCP Rohidas Pawar), सहायक पोलीस आयुक्त किशोर जाधव (ACP Kishor Jadhav)
यांच्या आदेशानुसार विमानतळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव (Senior Police Inspector Bharat Jadhav),
पोलीस निरीक्षक गुन्हे मंगेश जगताप (Police Inspector Mangesh Jagtap)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक सचिन जाधव (PSI Sachin Jadhav), पोलीस स्टाफ अविनाश शेवाळे, गणेश साळुंके,
उमेश धेंडे, सचिन जाधव, प्रदीप मोटे, गिरीष नाणेकर, नाना कर्चे यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Pune Crime | Viman Nagar police arrest two wheeler thief seize Rs 1 lakh worth of belongings

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा