Pune Crime | विमानतळ पोलिसांकडून ‘सेक्स’ रॅकेटचा पर्दाफाश, 4 मुलींची सुटका

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | विमानतळ पोलीस ठाण्याच्या (Vimantal Police Station) हद्दीत सेक्स रॅकेट (Sex Racket) चालवणाऱ्या एका एजंटला पोलिसांनी अटक (Arrest) केली आहे. आरोपी स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी मुलींकडून वेश्या व्यवसाय (Prostitution) करुन घेत असल्याची माहिती तपासात समोर (Pune Crime) आली आहे. पोलिसांनी या कारवाईत परदेशी मुलीसह इतर राज्यातील एकूण 4 मुलींची सुटका केली आहे. ही कारवाई बुधवारी (दि.2) साकोरेनगर परिसरात केली.

 

विमानतळ पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक सचिन जाधव (Police Naik Sachin Jadhav) यांना माहिती समजली की, साकोरेनगर परिसरात (Pune Crime) एक व्यक्ती खासगी वाहनातून काही मुलींना वेश्या व्यवसायासाठी घेऊन फिरत आहे. या व्यक्तीला फोनवर संपर्क केल्यानंतर तो त्याच्या जवळ असलेल्या मुलींना ग्राहकांना हॉटेलमध्ये उपलब्ध करुन देत आहे. हा एजंट साकोरेनगर परिसरात 4 मुलींना वेगवेगळ्या रिक्षातून घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली.

 

मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचला. आरोपी एजंट मुलींना घेऊन आल्यानंतर पोलिसांनी छापा टाकून एजंटला ताब्यात घेतले. तर त्याच्या ताब्यात असलेल्या उझबेकिस्तान (Uzbekistan), नेपाळ (Nepal), दिल्ली (Delhi) आणि मुंबई (Mumbai) येथील मुलींची सुटका केली. तसेच त्याच्याकडून 5 हजार 192 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. आरोपी ग्राहकांकडून मिळणारी आर्धी रक्कम स्वत: घेत होता. पुढील तपास पोलीस निरीक्षक गुन्हे मंगेश जगताप करीत आहेत.

ही कारवाई ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), पोलीस सह आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (Jt CP Joint Dr Ravindra Shisve),
अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशीक विभाग नामदेव चव्हाण (Addi CP Namdev Chavan),
पोलीस उपायुक्त रोहिदास पवार (DCP Rohidas Pawar), सहायक पोलीस आयुक्त किशोर जाधव (ACP Kishore Jadhav)
यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव (Senior Police Inspector Bharat Jadhav),
पोलीस निरीक्षक गुन्हे मंगेश जगताप (Police Inspector Mangesh Jagtap),
महिला पोलीस उपनिरीक्षक मंगल जोगन (PSI Mangal Jogan), पोलीस नाईक प्रदीप मोटे,
गणेश गायकवाड, पोलीस शिपाई रुपेश तोडेकर, कांबळे, बुऱ्हाडे यांच्या पथकाने केली.

 

 

Web Title :- Pune Crime | Viman Nagar police expose Prostitution racket, release 4 girls

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Metro | रविवारपासून नियमित धावणार ‘पुणे मेट्रो’, ‘या’ तिकीट दरात पुणेकरांना अनुभवता येणार मेट्रोचा सुखद प्रवास

 

Pune Cyber Crime | आर्मीची ऑर्डर असल्याचे सांगून व्यावसायिकाला 1 लाखांचा ऑनलाईन गंडा

 

OBC Reservation Maharashtra | SC ने ओबीसी आरक्षणाचा अहवाल फेटाळल्यानंतर ठाकरे सरकारने निवडणुकांसंदर्भात घेतला मोठा निर्णय !