Pune Crime | 25 वर्षीय ‘सारिका’नं दोन्ही डोळ्यांनी अंध असलेल्या 30 वर्षाच्या तरुणाशी केलं लग्न ! एकेदिवशी दाखवलं सर्वांनाच ‘काम’, पुण्यात ‘हे’ कृत्य केल्यानं 5 जण ‘गोत्यात’

पुणे : Pune Crime | दोन्ही डोळ्यांनी अंध असलेल्या तरुणाबरोबर लग्न केले. तरुणाच्या वडिलांकडून वेळोवेळी लाखो रुपये घेतले अन एके दिवशी घरातील दागिने चोरुन नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी विमानतळ पोलिसांनी (Viman Nagar Police Station) या तरुणीसह ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल (Pune Crime) केला आहे.

कैलासकुमार मानकमल सिंघवी (वय ४५), सारिका नंदलाल बंब (वय २५, रा. नाशिक), नंदलाल बंब (वय ६०), कमलाबाई नंदलाल बंब (वय ५९) आणि राजू कोठारी (वय ४०) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी विमाननगरमधील एका ३० वर्षाच्या तरुणाने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Multibagger Stock | शेयर बाजारात ‘बूम’, ‘या’ पेनी स्टॉकने वर्षभरात 1 लाखाचे केले 18 लाख!

 

राजस्थानमध्ये अनेक तरुणांना उपवर वधु मिळत नसल्याचा गैरफायदा घेऊन काही ठग अशा तरुणांच्या आईवडिलांना गाठतात. त्यांच्या मुलीचे लग्न तुमच्या मुलाशी लावून देतो, असे सांगून त्यांच्याकडून पैसे घेतात. त्यानंतर त्यांचे मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत लग्न लावले जाते. त्यानंतर माहेरी पाठवणीच्या वेळी काही तरी निमित्त काढून वधु व तिचे नातेवाईक पैसे व मुलीच्या अंगावर घातलेल्या दागिन्यासह पळून जात असल्याच्या काही घटना नाशिक (Nashik) परिसरात यापूर्वी घडल्या होता. तसाच प्रकार पुण्यात (Pune Crime) घडला आहे. हा प्रकार जानेवारी ३१ ते  जुलै २१ दरम्यान घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे दोन्ही डोळ्यांनी अंध आहेत.
हे माहिती असताना सुद्धा आरोपींनी आर्थिक फायद्यासाठी कट रचला.
सारिका बंब हिचे बनावट आधार कार्ड तयार करुन ते फिर्यादी व त्यांच्या वडिलांना दाखविले.
तिचे फिर्यादीसोबत लग्न लावून दिले. त्यानंतर फिर्यादी यांच्या वडिलांकडून त्यांनी वेळोवेळी ८ लाख ७३ हजार रुपये घेतले. त्यानंतर सारिका असे नाव सांगणारी फिर्यादीची पत्नी ३३ हजार ३५८ रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने व कपाटातील २० हजार रुपये रोख असा ऐवज घेऊन घरातून पळून गेली. फिर्यादी यांना आपली फसवणूक (Cheating) झाली असल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी सर्व खात्री करुन विमानतळ पोलिसांशी संपर्क साधून आता फिर्याद (Pune Crime) दिली असून पोलीस उपनिरीक्षक कोल्लुरे तपास करीत आहेत.

हे देखील वाचा

Maharashtra Police | राज्यातील 10 परिविक्षाधीनपोलीस उप अधीक्षक / सहायक पोलीस आयुक्तांच्या (DySp / ACP) नियुक्त्या

Pune Corporation | निविदा काढल्या नसतानाही ‘एक कोटी’ रुपयांच्या कामांची बिले सादर ! कोरोना काळात ‘स्मशानभूमीतील’ कामांच्या नावाखाली पालिकेच्या तिजोरीवर ‘दरोड्याचा प्रयत्न’; जाणून घ्या प्रकरण

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Pune Crime | viman nagar police register cheating case against five from nashik

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update