Pune Crime | ‘आमच्या घरी आजवर पोलीस आले नव्हते, म्हणणार्‍यांना पडल्या बेड्या’; जाणून घ्या पुण्यात भल्या पहाटे नेमकं काय घडलं

पुणे : Pune Crime | पोलीस समजावण्यासाठी गेले असताना आजपर्यंत आमच्या घरी पोलीस आले नव्हते, तुम्ही पोलीस आमच्या घरी कसे आले, आमची तक्रार कोणी केली असे म्हणून पहाटेच्या सुमारास दारु पिऊन भर रस्त्यात आरडाओरडा करुन गोंधळ (Pune Crime) घालणार्‍या दोघांना विश्रामबाग पोलिसांनी (Vishrambaug Police Station) अटक केली आहे.

मयांक संदीप पारखी Mayank Sandeep Parkhi (वय ३१, रा. आर एस एस कार्यालयासमोर, शनिवार पेठ) आणि आतिष समीर केकरे Atish Sameer Kekare (वय २३, रा. वसुंधरा अपार्टमेंट, प्रभात रोड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

याप्रकरणी पोलीस नाईक भोसले यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शनिवार पेठेत (Shaniwar Peth, Pune) पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास लाऊड स्पिकर लावून काही जण गोंधळ घालत असल्याचे पोलीस नियंत्रण कक्षाला नागरिकांनी कळविले. त्यानुसार पोलीस मार्शल भोसले हे तेथे गेले. तेथे तिघे जण दारु पिऊन मोठ मोठ्या आवाजात आरडाओरडा करीत होते. त्यांना भोसले यांनी समजाविले. तेव्हा त्यांनी अगोदर लाऊड स्पिकर बंद केला. पोलीस काही वेळ तेथेच थांबले असताना मयांक पारखी व आतिष केकरे खाली आले. त्यांनी भोसले यांना “आजपर्यंत पोलीस आमच्या घरी आले नव्हते. तुम्ही पोलीस आमच्या घरी कसे काय आले. आमची तक्रार कोणी केली,” असे म्हणून मोठमोठ्याने आरडाओरडा (Pune Crime) केला. फिर्यादी यांच्याबरोबर वाद घालून सार्वजनिक शांततेचा भंग करुन सरकारी कामात अडथळा आणला म्हणून त्यांच्यावर गुन्हा (Pune Crime) दाखल करण्यात आला आहे.

हे देखील वाचा

ITR Filing | फॉर्म 16 शिवाय भरू शकता इन्कम टॅक्स रिटर्न, सविस्तर जाणून घ्या पद्धत

ST Workers Strike | एसटी संपाचा तिढा सुटेना ! पुणे विभागातील 13 डेपो बंद; प्रवाशांची तारांबळ ((व्हिडीओ)

LPG Cylinder Price | तुम्हाला स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरसाठी मोजावे लागतील 1000 रुपये ! जाणून घ्या मोदी सरकारची योजना?

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Pune Crime | Vishrambaug Police arrest Mayank Sandeep Parkhi and Atish Sameer Kekare for disturbing public peace

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update