Pune Crime | आरटीओ अधिकार्‍यास जखमी करून पळालेला आरोपी 2 महिन्यांनी अटकेत

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – रॅपिडो अ‍ॅपद्वारे बेकायदा प्रवासी वाहतूक करताना आरटीओच्या अधिकर्‍यांनी थांबवल्यावर त्यांच्याशी हुज्जत घालून तसेच अधिकार्‍यास जखमी करून पळालेल्या आरोपीला (Pune Crime) अटक करण्यात आली आहे. विश्रांतवाडी पोलिसांनी त्यास अटक केली. मागील दोन महिन्यांपासून आरोपी (Pune Crime) पोलिसांना गुंगारा देत होता. अखेर त्याला गजाआड करण्यात पोलिसांना यश आले.

पिंटू पूर्णचंद्र घोष (रा. खडकवासला) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. शहरात बाइक टॅक्सीला बंदी आहे. घोष हा बाइक टॅक्सी घेऊन जात असताना विश्रांतवाडी येथे त्याला आरटीओ पथकाने अडविले. या कारवाईनंतर महिला अधिकारी त्याच्या गाडीवर पाठीमागे बसून त्याला आरटीओ कार्यालयात घेऊन जात होत्या. मात्र, घोष याने सहायक मोटार वाहन निरीक्षक अधिकार्‍यांशी झटापट करून त्यांना जखमी केले आणि पळ काढला.

आरोपींचा शोध घेत असताना तो खडकवासला भागात असल्याची माहिती पोलीस पथकाला मिळाली.
त्यानुसार विश्रांतवाडी पोलिसांनी त्याला सापळा रचत खडकवासला भागातून अटक केली.
पोलीस उपायुक्त शशिकांत बोराडे, विश्रांतवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय भापकर,
पोलीस निरीक्षक विजयकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सत्यवान गेंड यांच्या पथकाने ही कार्यवाही केली आहे.

Web Title :- Pune Crime | Vishrantwadi Police Arrest Criminal Who Abscond From 2 Months

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Nashik Crime | मनमाडमध्ये हात कापून 9 वर्षांच्या बालकाची हत्या; प्रचंड खळबळ

Sidhu MooseWala Murder Case | सिद्धू मुसेवालाच्या हत्येचा मास्टरमाइंड गोल्डी ब्रार कॅलिफोर्नियात

Pune ACB Trap | दीड लाखांची लाच घेताना शिवाजीनगर कोर्टातील वरिष्ठ लिपिक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात