Pune Crime | दुचाकीवरील 2 मुलांना चिरडून पळून गेलेल्या बस चालकाला वाकड पोलिसांकडून अटक

0
326
Pune Crime | Wakad police arrest bus driver who crushed 2 children on a two wheeler
File Photo

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | दुचाकीला धडक दिल्यानंतर जखमी झालेल्या दोघांना उपचारासाठी न नेता पळून गेलेल्या वाहन चलकाचा वाकड पोलिसांनी (Wakad Police) कसोशीने शोध घेऊन बेड्या ठोकल्या आहेत. हा अपघात (Accident) 28 डिसेंबर रोजी रात्री पावणे अकराच्या सुमारास बारणे कॉर्नर थेरगाव (Barne Corner Thergaon) येथे झाला होता. अपघातात (Pune Crime) एका तरुणाचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला होता. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.

शुभम बबन गायकवाड Shubham Baban Gaikwad (वय-20 रा. अश्विनी कॉलनी, ज्योतीबानगर काळेवाडी, पुणे) असे उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर नंदु ज्ञानेश्वर लोखंडे (Nandu Dnyaneshwar Lokhande) हा गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात (Wakad police station) गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी प्रकाश श्यामराव बुरंगे Prakash Shyamrao Burange (वय-27 रा. कुणाल हॉटेलचे मागे, वृंदावन कॉलनी, काळेवाडी) याला अटक (Arrest) करण्यात आली आहे.(Pune Crime)

थेरगाव येथील बारणे कॉर्नर येथे 28 डिसेंबरला रात्री पावणे अकराच्या सुमारास अनोळखी बसने दुचाकीवरील दोघांना उडविले. त्यानंतर बस चालक पसार झाला. यामध्ये शुभम गायकवाड याचा मृत्यू झाला तर नंदू लोखंडे हा जखमी झाला. धडक देणाऱ्या वाहनाची कोणतीही माहिती उपलब्ध नव्हती. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करुन प्रत्यक्षदर्शी कडून माहिती घेतली. त्यावेळी बसच्या खिडक्यांचे खाली पिवळे रांगाचा रेडीयम व त्याखाली निळ्या रंगाचा पट्टा असल्याची माहिती मिळाली.

मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही तपासले. संशयित बसचा शोध घेत असताना संशयित बस थेरगाव येथील आदित्य बिर्ला हॉस्पिटल (Aditya Birla Hospital) जवळ येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अशोक जगताप (PSI Ashok Jagtap) करीत आहेत.

 

ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश (CP Krishna Prakash), अपर पोलीस आयुक्त संजय शिंदे (Addl CP Sanjay Shinde),
पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 आनंद भोईटे (DCP Anand Bhoite), सहायक पोलीस आयुक्त श्रीकांत डिसले
(ACP Shrikant Disley) यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ.
विवेक मुगळीकर (Senior Police Inspector Dr. Vivek Mugalikar), पोलीस निरीक्षक गुन्हे संतोष पाटील
(Police Inspector Santosh Patil), सहायक पोलीस निरीक्षक
अभिजीत जाधव (API Abhijeet Jadhav), पोलीस उपनिरीक्षक गणेश तोरगल (PSI Ganesh Torgal),
पोलीस अंमलदार प्रमोद कदम, अतिक शेख, विक्रांत चव्हाण यांच्या पथकाने केली.

Web Title :- Pune Crime | Wakad police arrest bus driver who crushed 2 children on a two wheeler

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

EWS Reservation | EWS आरक्षण उत्पन्नाची मर्यादा 8 लाख रुपये कायम, केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र

Housing Sales Report | 2021 मध्ये पुण्यासह देशातील ‘या’ 7 टॉप शहरांत घरांची विक्री 71% वाढली, पुण्यात 53 % वाढ; ‘एनारॉक’च्या रिपोर्टमध्ये दावा

India’s Top 10 Companies | ‘या’ आहेत भारतातील टॉप 10 कंपन्या, 9 कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये मोठी उसळी