Pune Crime | पोलीस असल्याची बतावणी करुन लुटणाऱ्या इराणी टोळीच्या वाकड पोलिसांनी आवळल्या मुसक्या, 6 लाखाचा मुद्देमाल जप्त

पुणे / वाकड : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | रस्त्याने पायी जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना पोलीस (Police) असल्याची बतावणी करुन लुटणाऱ्या इराणी टोळीतील (Iranian Gang) तिघांना वाकड पोलिसांनी (Wakad Police) बेड्या (Arrest) ठोकल्या आहेत. अटक करण्यात आलेले आरोपी सराईत असून त्यांनी वाकडसह मुबईत (Mumbai) अशा प्रकारचे अनेक गुन्हे केल्याचे (Pune Crime) तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपींकडून 6 लाख 22 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

 

हैदर तहजिब सय्यद Haider Tehjib Sayyed (वय-55 रा. पाटील नगर, आंबिवली पश्चिम, कल्याण, जि. ठाणे), युनुस साबुर सय्यद Yunus Sabur Sayyed (वय-46 रा. पाटील नगर, सुपर स्टार बेकरीच्या मागे, गल्ली नं.5, आंबिवली पश्चिम, कल्याण), गाझी रफिक जाफरी Ghazi Rafiq Jafri (वय-35 रा. इंदिरा नगर, मंगलनगर झोपडपट्टी, आंबिवली, कल्याण) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी लक्ष्मण विठ्ठलराव देशमुख Laxman Vitthalrao Deshmukh (वय-64 रा. नविन सुभेदार ले आऊट, नागपूर) यांनी वाकड पोलीस ठाण्यात (Wakad police station) फिर्याद दिली आहे. आरोपी हैदर याच्यावर 39, युनुस सय्यद याच्यावर 5 आणि गाझी जाफरी याच्यावर 24 गुन्हे दाखल (Pune Crime) आहेत.

 

 

फिर्यादी हे 4 जानेवारी रोजी दुपारी 12 च्या सुमारास रस्त्याने पायी चालत जात असताना तीन अनोळखी व्यक्तींनी त्यांना आपण पोलीस असल्याचे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला. जबरी सोने चोरीचे गुन्हे (Theft Crime) घडत असल्याचे सांगून तुमचे सोने (Gold) पिशवी ठेवा असे सांगून दागिने (Jewelry) पिशवीत ठेवण्याच्या बहाण्याने हात चलाखीने 2 लाख 20 हजार रुपये किमतीचे 55 ग्रॅम सोने लंपास केले. घटनेचे गांभीर्य ओळखून आरोपींची शोध घेण्यासाठी पथके तयार करण्यात आली.

पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) तपासले असता गुन्हा करण्याची पद्धतीवरुन आरोपी इराणी असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी पाटील इस्टेट (Patil Estate) व लोणी काळभोर (Loni Kalbhor) परिसरात आरोपींचा शोध घेत असताना आरोपी कल्याण (Kalyan), ठाणे (Thane) येथील असल्याची प्राथमिक माहिती मिळाली. याचदरम्यान वाकड निगडी (Nigdi) येथील दोन गुन्हे केल्यानंतर आरोपी दोन दुचाकीवरुन मुंबईच्या दिशेने केल्याचे दिसून आले. आरोपीची नावे समजल्यानंतर पोलिसांनी खडकपाडा पोलीस ठाण्यातील (Khadakpada Police Station) पोलिसांच्या मदतीने आंबिवली (Ambivali) येथे जाऊन आरोपींचा शोघ घेतला मात्र, ते वस्तीत नसल्याची माहिती मिळाली.

 

पोलिसांनी आोपींच्या मोबाईलचे लोकेश तपासले असता ते बनेली येथील हॉटेल च्या पाठिमागे असल्याची माहिती मिळाली. पोलिसांची दोन पथके आरोपींना पकडण्यासाठी गेले असता पोलिसांना पाहून आरोपींनी तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. आरोपींचा पाठलाग करुन पोलिसांनी दोघांना पकडले तर एक आरोपी दलदलीच्या चिखलात लपून बसला. पोलिसांनी दलदलीच्या चिखलातून तिसऱ्या आरोपीला अटक केली. तर त्यांचा चौथा साथिदार हैदर उर्फ लंगडा पप्पू सय्यद उर्फ इराणी Haider alias Langada Pappu Sayyed alias Irani (वय-35) फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश (CP Krishna Prakash), अपर पोलीस आयुक्त संजय शिंदे (Addl CP Sanjay Shinde),
पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 आनंद भोईटे (DCP Anand Bhoite), सहायक पोलीस आयुक्त श्रीकांत डिसले (ACP Shrikant Disley)
यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर (Senior Police Inspector Dr. Vivek Mugalikar),
पोलीस निरीक्षक गुन्हे संतोष पाटील (Police Inspector Santosh Patil), सहायक पोलीस निरीक्षक अभिजीत जाधव (API Abhijeet Jadhav),
पोलीस उपनिरीक्षक गणेश तोरगल (PSI Ganesh Torgal), पोलीस अंमलदार बिभीषन कन्हेरकर, बाबाजान इनामदार, राजेंद्र काळे,
जावेद पठाण, बापुसाहेब धुमाळ, विजय गंभीरे, विक्रम कुदळ, दिपक साबळे, वंदु गिरे, प्रशांत गिलबीले, प्रमोद कदम, बाबा चव्हाण,
अतिक शेख, अतिश जाधव, कल्पेश पाटील, कौतेय खराडे, अजय फल्ले व नुतन कोंडे यांच्या पथकाने केली.

 

 

Web Title :- Pune Crime | Wakad police seize Rs 6 lakh worth of Iranian gangsters

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Skin Care Tips | तरुण आणि चमकदार त्वचा मिळविण्यासाठी ‘या’ 5 गोष्टी करा, चेहरा आरशासारखा चमकेल

 

 

Skin Care In Winter | ‘ही’ गोष्ट गुलाब पाण्यात मिसळून लावा, चेहरा चमकेल; तज्ञांनी सांगितले ‘हे’ फायदे

 

 

PM Kisan | PM किसान योजनेत मोठा बदल ! 12.44 कोटी शेतकऱ्यांवर होणार थेट परिणाम, कारण आता ही सुविधा झाली रद्द