Pune Crime | शेजाऱ्याच्या घरात चोरी करुन खरेदी केले पिस्टल आणि महागडे मोबाईल, गुन्हेगारांना वानवडी पोलिसांनी केली अटक; 8 लाखांचा मुद्देमाल जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | शेजाऱ्याच्या घरातील चोरलेले दागिने (Stolen Jewelry) विकून मिळालेल्या पैशातून पिस्टल (Pistol) आणि महागडे मोबाईल (Expensive Mobile) खरेदी करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना (Criminals) वानवडी पोलिसांनी (Wanwadi Police) अटक केली आहे. नितीन उर्फ दया विश्वास पोळ (Nitin alias Daya Vishwas Pol) आणि साहील खंडु पेठे (Sahil Khandu Pethe) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर आरोपींकडून सोन्याचे दागिने (Gold Jewelry) घेणाऱ्या रोहित संजय पंडित (Rohit Sanjay Pandit) याला देखील अटक (Arrest) करण्यात आली आहे. या कारवाईत पोलिसांनी (Pune Police) 8 लाख 39 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त (Pune Crime) केला आहे.

 

16 ऑक्टोबर 2021 रोजी वानवडी पोलीस ठाण्याच्या (Wanwadi Police Station) हद्दीतील एका घरामध्ये प्रवेश करुन घरातील दिवानमध्ये ठेवलेल्या दोन डब्यातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण 14 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेला होता. याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल केला होता. या गुन्ह्याचा तपास करत असताना तपास पथकातील (Investigation Team) पोलीस अंमलदार सर्फराज देशमुख (Sarfaraz Deshmukh) व संतोष नाईक (Santosh Naik) यांना चोरी करणारे त्याच वस्तीत राहणारे असल्याची माहिती मिळाली.

 

तपास पथकाने सापळा रचुन नितीन उर्फ दया पोळ (वय-33 रा. तरवडेवस्ती, महंमदवाडी रोड, हडपसर) याला ताब्यात घेतले. त्याची पोलीस कस्टडी रिमांड घेऊन सखोल चौकशी केली. चौकशी दरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली देऊन हा गुन्हा साहील पेठे (वय-20 रा. तरवडेवस्ती, हडपसर) याच्या मदतीने केल्याची कबुली दिली. त्यानुसार साहील पेठे याला ताब्यात घेतले.

दोन्ही आरोपींकडे चौकशी केली असता गुन्ह्यातील चोरलेले दागिने रोहित पंडीत (वय-37 रा. ससाणेनगर, हडपसर) याला दिल्याची माहिती दिली. पोलिसांनी पंडीत याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून गुन्ह्यातील 6 लाख 40 हजार रुपये किमतीचे 160 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त केले. आरोपींनी चौरीच्या पैशातून 19 हजार रुपयांचा ओप्पो कंपनीचा (Oppo Company) फोन व 50 हजार रुपयांचा आय फोन 11 प्रो-मॅक्स (IPhone 11 Pro-Max) घेतला होता. पोलिसांनी दोन्ही फोन, गुन्ह्यात वापरलेली होंडा कार, यामाहा दुचाकी असा एकूण 8 लाख 39 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तपासादरम्याने आरोपींनी जुन्या गाड्या दुरुस्त करण्यासाठी 50 हजार खर्च केल्याचे समोर आले. (Pune Crime)

 

आरोपी साहिल पेठे याने त्याचा अल्पवयीन साथीदाराच्या मदतीने तो राहत असलेल्या वस्तीमध्ये दशहत निर्माण करण्यासाठी याच पैशातून पिस्टल खरेदी केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. याबाबत वानवडी पोलीस ठाण्यात यापूर्वीच गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), पोलीस सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशीक विभाग नामदेव चव्हाण (Addl CP Namdev Chavan),
पोलीस उपायुक्त परिमंडळ 5 नम्रता पाटील (DCP Namrata Patil), वानवडी विभागाचे सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र गलांडे (ACP Rajendra Galande),
वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिपक लगड (Senior Police Inspector Deepak Lagad),
पोलीस निरीक्षक गुन्हे संदिप शिवले (Police Inspector Sandeep Shivale)
यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक जयवंत जाधव (API Jaywant Jadhav),
पोलीस उपनिरीक्षक संतोष तानवडे (PSI Santosh Tanwade), पोलीस अंमलदार अमजद पठाण, संतोष नाईक,
विनोद भंडलकर, अतुल गायकवाड, सर्फराज देशमुख, सचिन गवळी, सागर जगदाळे, शिरिष गोसावी,
निळकंठ राठोड, अमित चिव्हे, गणेश खरात, दिपक भोईर, सिद्धेश्वर कसबे व महिला पोलीस अंमलदार राणी खांदवे यांच्या विशेष पथकाने केली.

 

Web Title :- Pune Crime | Wanwadi police arrest criminals for stealing pistols and expensive mobiles from a neighbour’s house; 8 lakh confiscated

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Petrol-Diesel Rates Reduced | केंद्र सरकारनंतर राज्याचा देखील मोठा निर्णय ! पेट्रोल आणि डिझेल आणखी स्वस्त, जाणून घ्या

 

Ajit Pawar On Raj Thackeray | राज ठाकरेंच्या सभेनंतर अजित पवारांचे प्रत्युत्तर, म्हणाले – ‘राज ठाकरेंनी हवं ते म्हणावं, आम्हाला मात्र…’

 

Rajyasabha Election | राज्यसभेसाठी संभाजीराजे शिवसेना पुरस्कृत उमेदवार? शिवसेना फॉर्म्युल्यावर संभाजीराजेंमध्ये समझोता