Pune Crime | वाहन चोरी करणाऱ्या टोळीला वानवडी पोलिसांकडून अटक, 11 वाहने जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पुणे शहरातील वेगवेगळ्या भागात वाहन चोरी (Vehicle Theft) करणाऱ्या चार जणांना वानवडी पोलिसांना (Wanwadi Police) अटक (Arrest) केली आहे. त्यांच्याकडून 3 लाख रुपये किमतीच्या 11 चोरीच्या दुचाकी जप्त (Pune Crime) करण्यात आल्या आहेत. चारही आरोपी रेकॉर्डवरील आहेत. पुण्याच्या बाहेर वाहने विक्रीसाठी घेऊन जाण्याच्या तयारीत असतानाच त्यांना पोलिसांनी (Pune Police) अटक केली आहे.

 

सुरज श्रीकांत कांबळे (रा. तरवडेवस्ती, महंमदवाडी रोड पुणे सध्या मुपो कानाडी बोरगाव ता.जि. लातुर), गणेश बबन लोंढे (रा. महंमदवाडी रोड, पुणे), अनिकेत उर्फ मॉन्टी शरद माने (रा. साठेनगर चौक, महंमदवाडी, पुणे), भिमाशंकर उर्फ भिमा हरिभाऊ लाळगे (रा. आनंदनगर, महंमदवाडी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून वानवडी पोलीस ठाण्यातील (Wanwadi Police Station) चार, हडपसर (Hadapsar Police Station) मधील दोन, कोंढवा पोलीस ठाण्यातील (Kondhwa Police Station) दोन आणि लातूर जिल्ह्यातील मुरूड पोलीस ठाण्यातील (Murud Police Station) एक असे 9 गुन्हे उघडकीस आले आहेत. (Pune Crime)

 

वानवडी पोलीस ठाण्यातील तपास पथक वाहन चोरांचा शोध घेत असताना, काही संशयित तरुण चोरीची दुचाकी वाहने जिल्ह्याबाहेर विक्रीसाठी घेऊन जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलीस अंमलदार सर्फराज देशमुख (Sarfaraz Deshmukh) व निलकंठ राठोड (Nilkanth Rathod) यांना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून चारजणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चोरीची वाहने जप्त केली. आरोपीपैकी मॉन्टी माने हा मोक्का ((MCOCA) Mokka गुन्ह्यातून जामीनावर बाहेर आलेला आहे. तर लाळगे हा कोंढवा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे.

 

ही कारवाई आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), पोलीस सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशीक विभाग नामदेव चव्हाण (Addl CP Namdev Chavan),
पोलीस उपायुक्त परिमंडळ 5 नम्रता पाटील (DCP Namrata Patil), सहायक पोलीस आयुक्त पौर्णिमा तावरे (ACP Pournima Taware)
यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिपक लगड (Senior Police Inspector Deepak Lagad),
पोलीस निरीक्षक गुन्हे संदिप शिवले (Police Inspector Sandeep Shivale) तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक जयवंत जाधव (API Jaywant Jadhav), पोलीस उपनिरीक्षक संतोष तानवडे (PSI Santosh Tanwade), पोलीस उपनिरीक्षक अजय भोसले (PSI Ajay Bhosale),
पोलीस अंमलदार अमजद पठाण, संतोष नाईक, विनोद भंडलकर, अतुल गायकवाड, सर्फराज देशमुख,
महेश गाढवे, राहुल गोसावी, निलकंठ राठोड, संदीप साळवे, अमोल गायकवाड, विष्णु सुतार यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Pune Crime | Wanwadi Police arrests vehicle theft gang, seizes 11 vehicles

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Rain in Pune | पुण्यातील कात्रज घाटात दरड कोसळली; 15 दिवसातील तिसरी घटना

Pune Crime | 10 टक्के व्याजाने पैसे उकळणाऱ्या खाजगी सावकारावर गुन्हे शाखेकडून कारवाई

 

Belly Fat कमी करण्यासाठी खा ‘हे’ 5 फूड्स, नॅचरल पद्धतीने कमी करा पोटाची चरबी; जाणून घ्या