Pune Crime | लघुशंकेसाठी थांबणे तरुणाला पडले महागात, चोरट्याने सिनेस्टाईल मोटारसायकल नेली पळवून

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | खलनायक पळून जात असतो, नायकाला एक मोटारसायकल चालक लघुशंकेसाठी बाजूला गेलेला असतो, ते पाहून नायक त्याची मोटारसायकल घेऊन पाठलाग (Vehicle Theft In Pune) करायला लागतो, असे दृश्य यापूर्वी अनेक मराठी, हिंदी चित्रपटात आपण पाहिले आहे. असाच काहीसा प्रकार पुण्यातील (Pune Crime) चांदणी चौकात (Chandni Chowk) मंगळवारी पहाटे घडला.

याप्रकरणी एका 23 वर्षाच्या तरुणाने वारजे पोलीस ठाण्यात (Warje police station) फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास चांदणी चौकातून जात होते. एनडीए (NDA) बोर्डाजवळ ते थांबले. त्यांनी आपली मोटारसायकल पार्क केली आणि बाजूला जाऊन लघुशंका करु लागले. हे पाहून दोघा चोरट्यांनी (Thieves) त्यांची मोटारसायकल चालू करुन चोरुन नेली. आपल्या डोळ्या देखत मोटारसायकल चोरुन नेली असतानाही ते अशा स्थितीत होते की त्यांना चोरट्यांना अडवताही आले नाही. वारजे पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Web Title : Warje Malwadi Vehicle Theft In Pune 

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | शारीरीक संबंधाचे व्हिडिओ व्हायरल करण्याची दिली धमकी;
घरी, वेगवेगळ्या हॉटेल रुममध्ये आणि कारमध्ये बोलावून लैंगिक अत्याचार

 

Navneet Ravi Rana Sent To Judicial Custody | राणा दाम्पत्याच्या अडचणीत मोठी वाढ !
कोर्टाने सुनावली 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, जामीन अर्जावरील सुनावणीही लांबणीवर

 

Pune Crime | घरात घुसून 18 वर्षाच्या तरुणीचा विनयभंग, हडपसरच्या फुरसुंगी परिसरातील घटना

 

Pune Crime | इन्स्टाग्रामवर बनला मित्र, 20 वर्षाच्या तरुणीला कोल्ड्रींग मधून गुंगीचे औषध देऊन दाखवलं ‘काम’,
बलात्कार प्रकरणी FI