Pune Crime | क्राईम पेट्रोल मालिका बघून रचला कट, शितपेयातून महिलेला दिल्या झोपेच्या गोळ्या; खून करुन दागिने लुटणारा गुन्हे शाखेकडून गजाआड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | महिलेला शितपेयातून (Soft Drink) झोपेच्या गोळ्या (Sleep Pills) देऊन तिचा खून (Murder In Pune) करुन दागिने (Jewelry), मोबाईल (Mobile), एटीएम (ATM) आणि इतर वस्तू चोरुन नेल्याची (Stolen) घटना रविवारी हडपसर (Hadapsar) येथील वैदुवाडी (Vaiduvadi) येथे घडली होती. या गुन्ह्यातील आरोपी किसन सिताराम जगताप Kisan Sitaram Jagtap (वय-46) याला गुन्हे शाखा युनिट पाचच्या (Pune Police Crime Branch) पथकाने अवघ्या 10 तासात अटक करुन गुन्हा उघडकीस (Pune Crime) आणला आहे. आरोपीने मुलीच्या लग्नासाठी (Girl Wedding) पैशांची गरज असल्याने क्राइम पेट्रोल मालिका (Crime Patrol Series) पाहून महिलेच्या खुनाचा कट रचला.

 

याबाबत स्वाती लक्ष्मण कांबळे Swati Laxman Kamble (रा. मार्कंडेय नगर, वैदुवाडी हडपसर) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar police station) फिर्याद दिली आहे. पोलिसांन आयपीसी 302, 394 नुसार गुन्हा (FIR) दाखल करुन आरोपीचा शोध सुरु केला होता. या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा युनिट पाचचे पोलीस करत असता पोलीस अंमलदार यांना मयत महिलेचा मोबाईल किसन सिताराम जगताप (वय-46 रा. बेलसर, ता पुरंदर-Purandar) याच्या ताब्यात असून त्याने हा गुन्हा केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले. पोलिसांनी त्याचा शोध घेतला असता तो घरासमोर उभा असल्याचे दिसून आले. आरोपीने पोलिसांना पाहून पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी त्याला शिताफिने अटक केली. (Pune Crime)

 

क्राईम पेट्रोल मालिका पाहून रचला कट

आरोपीकडे सखोल चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली की, 2009 मध्ये हडपसर माळवाडी (Malwadi) येथे राहात असताना मयत महिलेसोबत ओळख होऊन तिच्यासोबत वरचेवर बोलत होतो. परंतु माझ्या मुलीच्या लग्नासाठी पैशांची गरज होती. त्यादरम्यान क्राईम पेट्रोल मालिका बघुन तीचा खुन करण्याचा प्लॅन केला. या महिलेचा खून करण्याचा प्लॅन तीन महिन्यापूर्वी आखल्याची माहिती आरोपीने दिली.

 

असा केला खून

आरोपी शनिवारी (दि.9) रात्री 11.30 च्या सुमारास हडपसर गाडीतळ येथे आला. थंड शितपेयाची बाटली घेऊन तिच्या राहत्या घरी गेला. घरी गेल्यानंतर तिच्यासोबत गप्पा मारण्याचे नाटक करुन शितपेयाच्या बाटलीत झोपेच्या गोळ्या टाकून ते तिला पाजले. तीला गुंगी आल्याच्या अवस्थेत रागाच्या भरात तिचे डोके भिंतीवर जोरात आपटले व तीला बेशुद्ध अवस्थेत खाली पाडुन तिचा खून केला. यानंतर तिचे सोन्याचे दागिने, मोबाईल, एटीएम कार्ड काढुन घेतले आणि कपाटातील इतर वस्तु घरातील दिवाणवर अस्ताव्यस्त टाकून तेथून निघून गेला. गुन्हे शाखा युनिट पाचच्या पथकाने गुन्ह्याचा तपास करुन अवघ्या 10 तासात आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

 

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta),
सह पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (Jt CP Dr Ravindra Shisve),
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale),
पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge),
सहायक पोलीस आयुक्त गुन्हे 1 गजानन टोम्पे (ACP Gajanan Tompe)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत पाटील (Police Inspector Hemant Patil),
सहायक पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर (API Krishna Babar), पोलीस अंमलदार रमेश साबळे,
महेश वाघमारे, आश्रुबा मोराळे, प्रमोद टिळेकर, प्रविण काळभोर, विशाल भिलारे, अकबर शेख, दाऊद सय्यद, विलास खंदारे, पृथ्वीराज पांडुळे यांनी केली.

 

Web Title :- Pune Crime | watching the Crime Patrol series, sleeping pills given to a woman from a soft drink; Murder and robbery of jewelery pune police crime branch solve case

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा