Pune Crime | घरफोडीच्या गुन्ह्यात सहभागी असलेल्या वॉचमनला गुन्हे शाखेकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन पुण्यात (Pune Crime ) घरफोडीच्या (Robbery) घटनांमध्ये वाढ होत असताना सुरक्षारक्षकानेच चोरी केल्याचा प्रकार समोर आला आहे. घरफोडी गुन्ह्यात सहभागी असलेल्या वॉचमनला (Watchman) गुन्हे शाखा युनिट एकच्या (Crime Branch Unit One) पथकाने शिताफीने अटक (Arrest) केली आहे. त्याच्याकडून 15 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. अमर गजानन सुर्यवंशी Amar Gajanan Suryavanshi (वय-48 रा. शास्त्रीनगर, मुठेश्वर कॉलनी, कोथरुड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

याप्रकरणी प्राची अनिल कडु (वय-27 रा. भैरवी बिल्डिंग, कोथरुड) यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात (Deccan Police Station) फिर्याद दिली आहे.
प्राची कडु या कर्वे रोड येथील आयडीया वोडाफोन स्टोअर (Idea Vodafone Store) याठिकाणी व्यवस्थापक म्हणून काम करतात.
तर आरोपी हा याठिकाणी सात वर्षापासून सुरक्षा रक्षक म्हणून काम करतो.
13 जानेवारी ते 14 जानेवारी या कालावधीत ऑफिस बंद असताना चोरट्यांनी शटरचे लॉक तोडून ऑफिसमधील लॅपटॉप, मोबाईल फोन, कॅमेरा असा 21 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला होता.

गुन्हे शाखा युनिट एकचे पथक हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार शशिकांत दरेकर (Shashikant Darekar) व दत्ता सोनवणे (Datta Sonawane) यांना कर्वेरोड येथील घरफोडीच्या गुन्ह्यामध्ये सुरक्षा रक्षक सुर्यवंशी याचा सहभाग असल्याची माहिती मिळाली.
मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून सुर्यवंशी याला ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली. चौकशी दरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
त्याच्याकडून 15 हजार रुपये किमतीचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे.
पुढील कारवाईसाठी त्याला डेक्कन पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
आरोपीला न्यायलयात हजर केले असता न्यायालयाने 13 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

 

ही कारवाई प्रभारी अपर पोलीस आयुक्त भाग्यश्री नवटके (IPS Bhagyashree Navatke),
पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge), सहायक पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे (ACP Laxman Borate) यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे (Senior Police Inspector Shailesh Sankhe), पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड (PSI Sanjay Gaikwad), सुनिल कुलकर्णी, पोलीस अंमलदार सतिश भालेकर, अजय थोरात, शशिकांत दरेकर, दत्ता सोनवणे, अनिकेत बाबर, तुषार माळवदकर, महेश बामगुडे यांच्या पथकाने केली.

 

Web Title : Pune Crime | Watchman arrested for burglary

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Maharashtra Rains | ठाणे, पुणे आणि कोल्हापुरात अतिवृष्टीचा इशारा; रत्नागिरीत ‘Orange Alert’ जारी

Kirit Somaiya | ‘शिवसेनेचा नेता आणि राष्ट्रवादीचा मंत्री रडारवर’, किरीट सोमय्यांचा खळबळजनक गौप्यस्फोट 

Pune Crime | दहशत पसरवणाऱ्या सार्थक मिसाळ गँगवर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्तांची ‘मोक्का’ कारवाई