Pune Crime | क्राईम ब्रँचचे पोलिस असल्याचे सांगून 6 ते 7 जणांकडून वॉचमनला बेदम मारहाण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  Pune Crime | क्राईम ब्रँचचे पोलिस असल्याचे सांगून 6 ते 7 जणांनी एका सोसायटीच्या वॉचमनला जबर मारहाण केल्याचा प्रकार (Pune Crime) सिंहगड रस्ता परिसरातील नऱ्हे (Narhe) येथे घडला आहे. तेथील मानाजीनगर येथे मीडिया सृष्टी फेज दोन येथील सोसायटीच्या वॉचमनला सहा ते सात जणांकडून मारहाण करण्यात आली आहे. ही घटना शुक्रवारी (17 सप्टेॆबर) रोजी पहाटे 2.30 च्या सुमारास घडली आहे. ही घटना सीसीटीव्हीत (CCTV) कैद झालीय.

याबाबत अधिक माहितीनूसार, वॉचमन पांडुरंग चव्हाण (Watchman Pandurang Chavan)
हा घरात झोपला असता पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास चौकशी करण्याच्या उद्देशाने क्राईम ब्रँच पोलिस असल्याचे सांगत 6 ते 7 जणांनी त्याला उठवले.
आणि आरोपी जाधव येथे कोठे राहतो, त्याच्याकडे इनोव्हा गाडी आहे अशी विचारणा केली.
याबाबत काही माहित नसल्याचे वॉचमन चव्हाण यांनी म्हटले.
तसेच चेअरमनला फोन करून विचारतो असं म्हटल्यावर त्यावेळी चव्हाण आरोपी जाधव यालाच फोन लावत आहे असे म्हणत त्याला जबर मारहाण व शिवीगाळ केली.
तसेच पत्नी व मुलांनाही धमकावले. नीट राहा नाहीतर सर्वांना हाकलून देईन, अशीही धमकी दिली.

दरम्यान पहाटेच्या वेळी चव्हाण नऱ्हे पोलीस चौकीत गेले असता चौकीत पाऊण तास कोणीही नव्हते.
त्यानंतर चव्हाण यांनी रूममध्ये डोकावून पाहिले असता एक पोलीस झोपल्याचे आढळून आले व त्यांना उठवून घडलेला सर्व प्रकार सांगितला.
मात्र, त्यांनी कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल करून घेतला नाही.
त्यानंतर घरी आल्यावर 5 तास उलटून गेले तरी कुठल्याही प्रकारची घटनास्थळी येऊन चौकशी पोलिसांनी केली नाही. असं पांडुरंग चव्हाण यांनी सांगितले आहे.

 

सीसीटीव्ही मध्ये पहाटे घडलेला संपूर्ण प्रकार कैद झाला आहे.
सकाळी 8 वाजता नऱ्हे पोलीस चौकी (Narhe police) मध्ये गेले.
असता पाऊण तास थांबून देखील तिथे कोणी नव्हते व झोपलेल्या पोलिसांने सांगितले की एपीआय कणसे आल्यानंतर फिर्याद नोंदवून घेतो.
तर आम्ही हा प्रकार घडल्या नंतर 100 नंबर पोलीस हेल्प लाईन ला संपर्क केला असता घडलेला
सर्व प्रकार सकाळी 8 च्या सुमारास सांगितला त्यांचे उत्तर सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास आले.
तरी देखील दुपारी 1 वाजेपर्यंत पोलीस घटनास्थळी आलेले नाहीत.
पोलीस नक्की रक्षक आहे की भक्षक हा प्रश्न आम्हला पडला आहे.
असे सोसायटी चेअरमन राकेश शर्मा (Rakesh Sharma) यांनी सांगितले आहे.

दरम्यान, अखेर 8 तासानंतर सिंहगड पोलिस ठाण्यात (Sinhagad Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास सिंहगड पोलीस करत आहे.
घडलेल्या प्रकारची चौकशी करून पुढील कारवाई करण्यात येईल.
संबंधित अधिकाऱ्यांना तशा सूचना दिल्याचं सिंहगड पोलीस स्टेशनचे पीआय प्रमोद कांबळे (PI Pramod Kamble) यांनी सांगितले आहे.

 

Web Title : Pune Crime | watchman beaten up for pretending to be a crime branch policeman fir in sinhagad raod police station

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Whatsapp Multi Device Support Feature | व्हॉट्सअ‍ॅपच्या वापरकर्त्यांसाठी मोठी खुशखबर ! ‘त्या’ फीचरची प्रतिक्षा संपली, जाणून घ्या

Chhagan Bhujbal | छगन भुजबळांनी मंत्री रावसाहेब दानवेंना मारला टोमणा, म्हणाले – ‘कदाचित त्यांना शिवसेनेत यायचं असेल’

Money laundering Case | सचिन वाझेचा खुलासा – ‘शरद पवारांना राजी करण्यासाठी अनिल देशमुखांनी 2 कोटी मागितले होते’