Pune Crime | काय सांगता ! होय, पुण्यात भाडे तत्त्वावर घेतलेल्या 77 कारचा वापर दारुच्या वाहतुकीसाठी

पुणे : Pune Crime | भाडे तत्त्वावर घेतलेल्या 77 कारचा अपहार करीत त्या दारुच्या वाहतुकीसाठी वापरण्यात आल्या आहेत. येरवडा पोलिस ठाण्यात (Yerwada Police Station) दाखल असलेल्या गुन्ह्यात पोलिसांनी केलेल्या तपासातून ही बाब स्पष्ट झाली आहे. त्यातील 46 कार पोलिसांनी (Pune Crime) जप्त केल्या आहेत.

पुणे पोलिसांनी जप्त केल्या 46 कार

या प्रकरणात एकाचा जामीन अतिरिक्त सत्र न्यायाधीश जी. पी. आगरवाल (Additional Sessions Judge G. P. Agarwal) यांनी फेटाळला. अयान ऊर्फ राहुल ऊर्फ ऍन्थोनी पॉल छेत्तीयार (वय 38, रा.मुंबई) असे जामीन फेटाळलेल्याचे नाव आहे. टुर्स अँड ट्रॅव्हल्स व्यवसायिक श्रीधर जगताप यांनी याबाबत येरवडा पोलिसात फिर्याद दिली आहे. या गुन्ह्यात छेत्तीयार याच्यासह आशिष गंगाराम पुजारी, (वय 32), सत्यप्रकाश मिठाईलाल वर्मा (वय 30), मोहमंद वसीम मोहम्मद फरीद शेख (वय 33) आणि जावेद अब्दुससत्तार शेख (वय 46) यांना अटक करण्यात आली आहे. फिर्यादींकडून 24 जून रोजी इनोव्हा कार या प्रकरणात गुन्हा दाखल असलेल्या एका व्यक्तीने नेली. करारात ठरल्याप्रमाणे सरकारी अधिकाऱ्याला गाडी भाड्याने देणे अपेक्षित होते. मात्र गाडीचा वापर दारूच्या वाहतुकीसाठी करण्यात आला. तसेच भाडे आणि गाडी परत करण्यात आली नाही.

Nagpur News | देवेंद्र फडणवीस यांच्या चुलत भावाचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन

त्यामुळे तक्रार दिल्यानंतर आरोपींना अटक करण्यात आली होती. या प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेल्या छेत्तीयार याने जामिनासाठी अर्ज केला. यास अतिरिक्त सरकारी वकील लीना पाठक (Additional Public Prosecutor Leena Pathak) यांनी विरोध केला. या गुन्ह्यातील आरोपींकडून तब्बल 77 गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. त्याच्यावर नेरूळ (Nerul Police Station) आणि ओशिवारा पोलीस स्टेशन (Oshiwara Police Stations)येथे गुन्हा दाखल आहे. आरोपींचे मोठे रॅकेट असण्याची शक्‍यता आहे. जामीन मिळाल्यास तो पुन्हा अशा प्रकारचे गुन्हा करण्याची, पुराव्यामध्ये ढवळाढवळ करण्याची अथवा परागंदा होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे त्याचा जामीन फेटाळण्याची मागणी ॲड. पाठक यांनी केली. येरवडा पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक समीर करपे (API Sameer Karpe) या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.

हे देखील वाचा

Salman Khan | एयरपोर्टवर सलमान खानला रोखण्याच्या प्रकरणात देशातील 2 प्रमुख वृत्तपत्र ‘गोत्यात’, फेक न्यूज पसरवण्याचा आरोप; आता CISF ने स्वत: सांगितले ‘सत्य’

Pune Crime | धक्कादायक ! नशेचे इंजेक्शन देऊन ‘मॉडेल-रॅपर’कडून 17 वर्षीय मुलीवर बलात्कार, पुण्याच्या हिंजवडीतील घटना

High Court | विवाहाशिवाय जन्मलेल्या मुलाच्या पित्याचे नाव सांगण्याची नाही आवश्यकता – हायकोर्ट

ट्विटर ला देखील फॉलो करा

 

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Pune Crime | What do you say! Yes, 77 cars rented in Pune are used for transporting liquor

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update