Pune Crime | काय सांगता ! होय, भांडणे ‘काका-काकी’त, पुतण्याला मागितली 10 लाखांची खंडणी; बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची दिली धमकी, 2 महिलांसह तिघांविरुद्ध FIR

पुणे : Pune Crime | काका आणि काकी यांच्यात भांडणे झाल्याने काकी घर सोडून निघून गेली. तिने इतरांशी संगनमत करुन पुतण्याला धमकावले असून १० लाख रुपयांची खंडणीची मागणी केली आहे. जर पैसे दिले नाही तर बलात्काराची (Rape) फिर्याद देऊन जेलमध्ये टाकू अशी धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार (Pune Crime) समोर आला आहे.

याप्रकरणी उत्तम बबन पवार (वय ३५, रा. राक्षेवाडी, खेड) यांनी खेड पोलिसांकडे (Khed Police) फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी दोन महिलांसह तिघांविरुद्ध खंडणी (Ransom) मागितल्याचा गुन्हा (Pune Crime) दाखल केला आहे. हा प्रकार खेड पोलीस ठाण्याच्या गेटसमोर २१ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजता घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या काकांबरोबर आरोपीने लग्न केले.
लग्नानंतर त्यांच्यात भांडणे झाल्याने काकी त्यांचे घरातून निघून गेली. त्यानंतर तिने इतर दोघांशी संगनमत करुन फिर्यादीला धमकाविले. तू आम्हाला १० लाख रुपये दे, नाहीतर आम्ही तुझ्याविरुद्ध नगर येथे जाऊन बलात्काराची फिर्याद दाखल करु, असे म्हणून त्यांच्याकडे १० लाख रुपयांची फोनवर खंडणी मागितली. तू जर पैसे दिले नाही तर तुला जेलमध्ये टाकू अशी धमकी दिली. खेड पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून सहायक पोलीस निरीक्षक रानगट तपास करीत आहेत.

हे देखील वाचा

Experts-Advice | जीन्स महिन्यातून एकदा आणि ब्रा आठवड्यातून एकदा धुवा, एक्सपर्ट देतात असा सल्ला; जाणून घ्या का?

Gold Price Today | सोन्याच्या दरात मोठी घसरण; जाणून घ्या आजचे दर

Indian Railway ने लाँच केली बायोमेट्रिक टोकन मशीन, जनरल कोचमध्ये होईल रिझर्व्हेशनसारखी व्यवस्था; जाणून घ्या

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Pune Crime | What do you say Yes, in the quarrel ‘Kaka-Kaki’, nephew demanded a ransom of Rs 10 lakh; Threatened to file rape case, FIR against three including 2 women

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update