Pune Crime | पिंपरी-चिंचवडमध्ये WhatsApp वरुन सुरु असलेल्या ‘सेक्स’ रॅकेटचा पर्दाफाश; दिवसा तासाला 5-9 हजार तर रात्री 20 हजार

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) सामाजिक सुरक्षा पथकाने (Social Security Cell) व्हॉट्सअ‍ॅपवरून चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा (Prostitution Racket) पर्दाफाश केला आहे. याप्रकरणात दिल्ली येथील 2 तर छत्तीसगड येथील 1 अशा एकूण तीन तरुणींची पोलिसांनी सुटका (Pune Crime) केली आहे. याबाबत जॅक, बबलू आणि करण नावाच्या व्यक्तिंविरोधात चिंचवड पोलीस ठाण्यात (Chinchwad Police Station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण यांनी दिली.

 

WhatsApp वरून चालवत होता धंदा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जॅक नावाचा व्यक्ती व्हॉट्सअ‍ॅपवरून सेक्स रॅकेट चालवत होता. तो ग्राहकांना तिन्ही तरुणीचे फोटो व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवत होता. त्यापैकी आवडलेल्या तरुणीच्या नावावर रुम बुक करत होता. संबंधित मुलीला हॉटेलमध्ये पाठवून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करुन घेत होता. आरोपी तरुणींना एका रात्रीचे 13 ते 20 हजार रुपये, तर दिवसाला एका तासाला 5 ते 9 हजार रुपये घेत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. (Pune Crime)

3 मुलींची सुटका
चिंचवड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील हॉटेल कामिनी (Hotel Kamini) येथे व्हॉट्सअ‍ॅपवरुन सेक्स रॅकेट चालवत असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला समजली. पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून माहितीची खातरजमा करुन हॉटेलवर छापा टाकून सेक्स रॅकेटचा पर्दाफाश (Exposed) करण्यात आला. पोलिसांनी तीन मुलींची सुटका करुन तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश (CP Krishna Prakash), अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे (Addl CP Dr. Sanjay Shinde), पोलीस उपायुक्त गुन्हे डॉ. काकासाहेब डोळे (DCP Dr. Kakasaheb Dole), सहायक पोलीस आयुक्त डॉ. प्रशांत अमृतकर (ACP Dr. Prashant Amrutkar) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण (Police Inspector Devendra Chavan), सहायक पोलीस निरीक्षक डॉ. अशोक डोंगरे (API Dr. Ashok Dongre), पोलीस उपनिरीक्षक प्रदिपसिंग सिसोदे (PSI Pradipsingh Sisode), धैर्यशिल सोळंके (PSI Dhairyashil Solanke), पोलीस अंमलदार विजय कांबळे, किशोर पढेर, संतोष बर्गे, नितीन लोंढे, भगवंता मुठे, अमोल साडेकर, जालिंदर गारे, वैष्णवी गावडे, राजेश कोकाटे, गणेश कारोटे, अतुल लोखंडे, योगेश तिडके, अमोल शिंदे, सुमित डमाळ यांच्या पथकाने केली.

 

Advt.

Web Title :- Pune Crime | WhatsApp Prostitution racket exposed Pimpri-Chinchwad Police Pune Crime

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Mutual Fund SIP | दररोज गुंतवा 167 रुपये, निवृत्तीपुर्वी तुम्ही बनाल करोडपती, मिळतील 11.33 कोटी; जाणून घ्या

 

Narayan Rane | पुन्हा एकदा नारायण राणे VS शिवसेना वाद पेटणार ! मालवण चिवला बीचवरील निलरत्न बंगल्यावर कारवाईचे आदेश?

 

Garlic Health Benefits | जर लसणाला आले कोंब तर फेकू नका, यापासून आरोग्याला होतात अनेक फायदे; जाणून घ्या