Pune Crime | रिव्हर्स घेताना कार घातली अंगावर; डॉक्टर महिलेवर गुन्हा दाखल

पुणे : Pune Crime | कार रिव्हर्स घेताना रस्त्याच्या कडेला झोपलेल्याच्या अंगावर गाडी गेली. त्यात त्याचा मृत्यु (Death) झाला. तब्बल पाच महिन्यांनंतर हा प्रकार उघडकीस आला असून कारचालक महिला डॉक्टरवर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime)

डॉ. अश्वीनी आदित्य साळुंखे Dr. Ashwini Aditya Salunkhe (रा. मार्वल झेटा सोसायटी, खराडी) असे गुन्हा दाखल झालेल्या कारचालक महिलेचे नाव आहे. अल्लाबक्ष अन्वर शेख (वय ४२, रा. येरवडा) असे मृत्यु पावलेल्याचे नाव आहे. हा प्रकार चंदननगर येथील जुना मुंढवा रोडवरील रिलॅक्स पॉईंट हॉटेलसमोर रस्त्याच्या कडेला ७ जून २०२२ रोजी दुपारी साडेबारा वाजता घडला होता. (Pune Crime)

याबाबत पोलीस उपनिरीक्षक अरविंद कुमरे (Sub-Inspector of Police Arvind Kumre) यांनी चंदननगर
पोलीस ठाण्यात (Chandannagar Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंदननगर येथील जुना मुंढवा रोडच्या कडेला ७ जून रोजी अल्लाबक्ष हा दारु पिऊन झोपला होता. त्याच्या अंगावरुन अज्ञात वाहन गेल्याने त्यात त्याचा मृत्यु झाला होता. अकस्मात मृत्यु अशी नोंद करुन पोलीस तपास करीत होते. त्यावेळी त्यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली. अल्लाबक्ष शेख हा रस्त्याच्या कडेला झोपला असताना डॉ. साळुंखे या त्यांची कार रिव्हर्स (Car Reverse) घेत असताना मागे ती शेख याच्या अंगावर गेली. त्यात तो गंभीर जखमी होऊन त्याच्या मृत्युस कारणीभूत ठरल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title :-  Pune Crime | When the car is in reverse; A case has been registered against the woman doctor

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Alia Bhatt-Ranbir Kapoor | आलिया-रणबीरच्या लेकीसाठी पाकिस्तानी अभिनेत्याने लिहिली ‘हि’ खास पोस्ट

Aditya Thackeray | नोटीस देण्याआधी खोके म्हणजे नक्की काय? सांगावं, आदित्य ठाकरेंचा शिंदे सरकारला सवाल