Pune Crime | पुण्यात मांजरीला वाचविताना तरुण पडला वेताळ टेकडीवरील खाणीत; अग्निशामक दलाच्या जवानांनी काढले सुखरुप बाहेर (व्हिडिओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | मांजरीला वाचविताना वेताळ टेकडीवरील (Vetal Tekdi) 70 फुट खोल खाणीत पडलेल्या तरुणाला अग्निशामक दलाच्या (Pune Fire Brigade) जवानांनी सुखरुप बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले.

 

रामदास उभे (वय 24, रा. म्हातोबानगर, कोथरुड) असे या तरुणाचे नाव आहे. त्याच्या पायाला फ्रक्चर झाले असून डोक्याला इजा झाली आहे. (Pune Crime)

 

याबाबत अग्निशामक दलाने दिलेल्या माहितीनुसार, रामदास उभे हा आपल्या 2 बहिणींसह वेताळ टेकडीवर सकाळी फिरायला आले होते. सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास टेकडीवरील खाणीच्या वर एका मांजराला वाचविण्याच्या प्रयत्नात त्यांचा तोल जाऊन तो खाली 70 ते 80 फुट खोल असलेल्या खाणीत पडला. अग्निशामक दलाला याची खबर मिळाल्यावर अग्निशामक दलाचे जवान तातडीने तेथे पोहचले. मात्र, गाडी खाणीजवळ पोहचू शकत नव्हती. छोट्या गाडीने जवान खाणीजवळ पोहचले. (Pune Crime)

 

 

उभे हा खाणीतील झुडपे व पाणी याच्यावर पडला होता. त्याच्या पायाला इजा झाल्याने तो चालू शकत नव्हता.
जवान रोपच्या सहाय्याने त्याच्याजवळ पोहचले. काही जण पाण्यातून गेले. तोपर्यंत 108 रुग्णवाहिका आली होती.
त्यातील स्टेचरवर या तरुणाला घेतले. त्यानंतर पाण्यातून जवानांनी त्याला कमी उंचीवर असलेल्या ठिकाणी आणून तेथून त्याला वर उचलून घेतले.
त्यानंतर रुग्णालयात दाखल केले आहे.

 

या कामगिरीत अग्निशमन अधिकारी राजेश जगताप, चालक अमोल शिंदे, विजय शिंदे, तांडेल सचिन आयवळे,
राजेश कुलकर्णी व जवान सचिन वाघोले, शैलेश दवणे, जितेंद्र कुंभार, प्रविण रहाटे, पंढरीनाथ उभे, संजय भावेकर,
प्रकाशदाजी कांबळे, शुभम गोल्हार, हेमंत कांबळे यांनी सहभाग घेतला.

 

Web Title :- Pune Crime | While rescuing a cat in Pune, a young man fell into a mine on Vetal Tekdi; Firefighters pulled him out safely

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा