Pune Crime | ‘तू कोण अधिकारी आहे का?, माझ्या नादी लागलास तर जीवानिशी मारुन टाकीन’ ! पुणे मनपाच्या नगरसेवकाच्या कार्यकर्त्याला ठेकेदाराची मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | एका बाजूला ठेकेदाराचे अपहरण करुन त्याच्याकडून नगरसेवक जबरदस्तीने प्रतिज्ञापत्र लिहून घेण्याचा प्रकार नुकताच घडला असताना आता ठेकेदाराकडून नगरसेवकाच्या कार्यकर्त्याला बेदम मारहाण (Pune Crime) करण्याचा प्रकार समोर आला आहे.

 

रामटेकडी वानवडी क्षेत्रीय कार्यालयाच्या आवारात एका ठेकेदार व त्याच्या साथीदारांनी कार्यकर्त्याला लाथाबुक्क्यांनी व हाताने मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी (Pune Crime) देण्याचा प्रकार बुधवारी दुपारी १ वाजता घडला.

 

याप्रकरणी ज्ञानेश्वर गरड (वय ४१, रा. रामनगर, हडपसर) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात (Wanwadi Police Station) फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी ठेकेदार विजय अलकुंटे व त्याचे साथीदार शुभम कांबळे, विशाल ओरसे, लक्ष्मण डोंगरे, डांगडे (सर्व रा. शंकर मठ, हडपसर) व इतर दोन ते तीन जणांवर गुन्हा दाखल (Pune Crime) केला आहे.

 

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामटेकडी प्रभाग (Ramtekdi Prabhag) क्रमांक २४ चे नगरसेवक अशोक कांबळे (Corporator Ashok Kamble) व इतर पक्ष कार्यकर्ते यांच्यासोबत विकास कामांच्या पुर्ततेसाठी उपअभियंता कार्यालयात चर्चा करण्यात येत होती. त्यावेळी अशोक कांबळे यांनी उपअभियंता कुंजन जाधव यांना प्रभागामधील ड्रेनेज, क्रॉकीट टेंडर पास झाले असून अद्यापपर्यंत कामे सुरु झाली नाहीत, असे विचारले. तेव्हा जाधव यांनी संबंधित ठेकेदार विजय अलकुंटे याला फोन लावून दिला.

अशोक जाधव यांच्या सांगण्यावरुन फिर्यादी गरड यांनी फोनवरुन ‘‘रामटेकडी प्रभाग २४ मधील कामे पूर्ण झाली नाहीत,
ती पूर्ण करुन घ्या’’ असे म्हणाले. त्यावर अलकुंटे याने फिर्यादीस
‘‘तू कोण अधिकारी आहे का माझ्या कामाची चौकशी करणारा, मला जेव्हा वाटेल तेव्हा काम सुरु करेल,’’
असे म्हणून इतर साथीदारांना सोबत घेऊन तो क्षेत्रीय कार्यालयात आला व फिर्यादी यांना शिवीगाळ करुन
लाथा बुक्क्यांनी व हाताने मारहाण (Pune Crime) केली. ‘‘माझ्या नादी लागलास तर जीवानिशी मारुन टाकील’’ अशी धमकी दिली.
तसेच विशाल ओरसे याने त्याच्या पँटचे मागील बाजूस लपवलेले लोखंडी हत्यार काढून फिर्यादीस शिवीगाळ केली.
यावरुन गुन्हा (Pune Crime) दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक केंजळे तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | ‘Who are you?’ If you touch me, i will kill you! ‘Pune Municipal Corporation corporator ashok kamble worker beaten by contractor vijay alakunte and threatened with death

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा