Pune Crime | CCTV मध्ये कैद होवून दंड बसू नये म्हणून लढवलेली शक्कल आली अंगलट; प्रसाद कटारियाविरूध्द FIR दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | रस्त्यावरील सीसीटीव्हीमध्ये (CCTV) आपली दुचाकी सापडू नये, म्हणून त्याने आपल्या वाहनावरील एक आकडा खोडला. त्यामुळे सीसीटीव्हीत सापडला तरी त्याच्यापर्यंत पोलीस पोहचू शकत नव्हते. नाकाबंदीत सापडल्यावर हा प्रकार उघडकीस आला असून पोलिसांनी त्याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा (Pune Crime) दाखल केला आहे.

 

प्रसाद कटारिया Prasad Kataria (Vidya Shri Society, Satara Road – रा. विद्या श्री सोसायटी, सातारा रोड) असे त्याचे नाव आहे. याप्रकरणी वाहतूक शाखेतील पोलीस शिपाई धीरज शेलार यांनी खडक पोलीस ठाण्यात (Khadak Police Station) फिर्याद दिली आहे. हा प्रकार सप्टेबर २०१९ पासून आतापर्यंत पुणे शहरातील विविध ठिकाणी व १ नोव्हेबर रोजी गोटीराम भैय्या चौकात घडला.

 

आरोपीने आपल्या दुचाकीवरील आर टीओच्या चार आकडी नंबरपैकी सुरुवातीचा ८ आकडा खोडून टाकला. त्यामुळे त्यांच्या वाहनाचा क्रमांक एम एच १२ जेडब्ल्यु ८६५ असा नोंद ठेवून शासनाची फसवणूक केली. शहरातील विविध चौकातील सीसीटीव्हीमध्ये त्याची दुचाकी कैद झाली होती. मात्र, नंबर चुकीचा असल्याने त्यावर पुढे कारवाई (Pune Crime) होऊ शकली नव्हती.

 

धीरज शेलार हे गोटीराम भैय्या चौकात सायंकाळी ६ वाजता असताना त्यांनी प्रसाद याला थांबविले.
मात्र, तो न थांबता पळून जाऊ लागला. तेव्हा त्याचा पाठलाग करुन पकडले.
त्याच्याकडे परवानाबाबत चौकशी केल्यावर त्याने असहमती दर्शवून तेथून तो निघून गेला.
त्यावेळी त्याने नंबरप्लेटवरील एक आकडा खोडल्याचे आढळून (Pune Crime) आले. पोलीस उपनिरीक्षक घाडगे तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | who fought to avoid being imprisoned and fined in CCTV; FIR filed against Prasad Kataria

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Multibagger Stock | 34 रुपयांचा शेयर झाला 130 रुपयांचा, एक वर्षात दिला 250 टक्केपेक्षा जास्त रिटर्न, तुमच्याकडे आहे का हा Stock?

RRC Railway Recruitment-2021 | सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ! रेल्वेत 1600 हून अधिक पदांसाठी बंपर भरती, जाणून घ्या सविस्तर

Pune Crime | फसवणूक प्रकरण ! एम.जी. एन्टरप्रायजेसच्या अलनेश सोमजी व पत्नी डिंपल सोमजीला ‘एवढ्या’ दिवसांची पोलीस कोठडी (व्हिडीओ)