Pune Crime | बायकोच्या ‘मारा’ला घाबरुन पळणार्‍या नवर्‍याची लोकांकडून ‘चोर’ समजून ‘धुलाई’ !

पुणे : Pune Crime | दारु पिऊन आल्यानंतर पत्नीबरोबर त्याचे भांडण झाले. पत्नी अंगावर धावून आल्याचे पाहून तिचा मार चुकविण्यासाठी तो पळून जाऊ लागला. त्याला पकडण्यासाठी पत्नी त्याच्या मागे ओरडत जाऊ लागली. मात्र,  पळून जाणार्‍या पतीला रस्त्यावरील लोकांनी चोर समजून पकडून लाकडी काठीने बेदम मारहाण (Pune Crime) केली. हा अगदी चित्रपटात शोभावा असा प्रकार दौंड तालुक्यातील गोवागल्ली येथे ११  ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजता घडला. या प्रकरणी दौंड पोलिसांनी (Daund Police) गणेश आरेसन काळे व इतर दोन ते तीन जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत ज्युली दिल्या चव्हाण (वय ३२, रा. तुकाईनगर, ता. दौंड) यांनी फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्युली चव्हाण ही तिचा पती दिल्या आरमान चव्हाण व सवत एकत्र राहतात. ११  ऑगस्टला सायंकाळी दिल्या हा दारु पिऊन घरी आला. त्यावरुन त्यांच्यात भांडणे झाली. तेव्हा ज्युली त्याच्या अंगावर धावून गेली. ती आपल्याला मारायला येत असल्याचे पाहून दिल्या पळू लागला. ज्युलीही त्याच्या पाठीमागे धावली. दिल्या पुढे पळत होता तर त्याच्या मागे ज्युली धावत होती. त्यामुळे चोरटा पळून जात असल्याचे समज भक्तू शेठ यांच्या दुकानासमोर झोपलेला गणेश आरेसन  काळे व इतरांना झाला. त्यांनी चोर चोर करीत दिल्या याला पकडून लाकडी काठीने डोक्यावर, कपाळावर, हातावर, मांड्यावर मारहाण करीत चांगलाच चोप दिला. नवरा बायकोच्या भांडणात गैरसमजातून दारुड्या पतीला चांगलाच चोप मिळाला. पोलिसांनी मारहाणीचा गुन्हा दाखल केला असून पोलीस निरीक्षक पवार तपास करीत आहेत.

हे देखील वाचा

Latur Crime | वृद्ध बहिणींचा खुन करुन मृतदेह पुरल्यावर त्यावर गायीला मारुन टाकले; पुरावा नष्ट करण्यासाठी जावयाने केले कृत्य

Royal Enfield चे CEO विनोद दसारी यांनी दिला राजीनामा, बी. गोविंदराजन बनले नवीन एग्झीक्यूटीव्ह डायरेक्टर

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Pune Crime | wife beat husband in daund

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update