Pune Crime | GPS मुळे पतीच्या विवाहबाह्य संबंधाचे फुटले बिंग, पतीवर FIR

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पतीच्या संशयास्पद वागणुकीमुळे पत्नीने त्याच्या चारचाकी वाहनात बसवलेल्या जीपीएसमुळे (GPS) पतीच्या विवाहबाह्य संबंधांचे (Husband Extramarital Affair) बिंग फुटले. हा प्रकार (Pune Crime) बावधन येथील व्हिवा इन हॉटेल (Viva Inn Hotel Bavdhan) येथे 21 ऑक्टोबर 2020 रोजी घडला असून पत्नीने दिलेल्या फिर्यादीनुसार हिंजवडी पोलिसांनी (Hinjewadi Police) पतीवर गुन्हा (FIR) दाखल केला आहे. अरिफ अब्दुल मांजरा Arif Abdul Manjra (वय 41, रा. मसाला, ता. मांगरोड, जि. सुरत) असे त्याचे नाव आहे.

 

याबाबत मिळालेली माहिती अशी की, अरिफ आणि फिर्यादीचा २००५ मध्ये सुरतला (Surat) विवाह झाला होता. विवाहानंतर कामानिमित्त अरिफ बेंगळुरू (Bangalore) येथे जात होता. त्यामुळे पत्नीलाही त्याच्यावर संशय येऊ लागला. त्याचे वागणे देखील संशयास्पद वाटू लागल्याने फिर्यादीने 21 ऑक्टोबर 2020 रोजी अरिफच्या चार चाकी वाहनात जीपीएस डिव्हाईस लावले. त्या डिव्हाइसवरून बावधन येथील हॉटेल व्हिवा येथे अरिफ असल्याची माहिती मिळाली. (Pune Crime)

फिर्यादीने त्यानंतर संबंधित हॉटेलचा नंबर इंटरनेटवरून मिळवून तिथे संपर्क साधला. तेथे चौकशी केली असता त्यावेळी अरिफ आणि त्याच्यासोबत त्याची पत्नी असल्याचे हॉटेलमधून समजले. त्यानंतर फिर्यादीने नोव्हेंबर 2020 मध्ये थेट बावधनचे हॉटेल व्हिवा गाठले.तेथे पोहोचल्यानंतर पती अरिफ याच्यासोबत एक महिला फिर्यादी यांचे आधार कार्ड वापरून राहिल्याचे फिर्यादी महिलेला समजले. त्यानंतर हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज (CCTV Footage) तपासले. त्यात अरिफ बरोबर ती महिला दिसली. सीसीटीव्ही फुटेज मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून घेतल्यानंतर फिर्यादीने हिंजवडी पोलीस ठाण्यात (Hinjewadi police station) फसवणूकीची (Fraud) तक्रार दाखल केली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक छाया बोरकर (PSI Chhaya Borkar) करत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | wife installs gps on car of husband opened extramarital affair of man pimpri chinchwad news

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा