Pune Crime | चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीच्या डोक्यात कोयत्याने वार करुन खुन; पुनावळे येथील घटना

पुणे : Pune Crime | चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीच्या डोक्यात कोयत्याने वार करुन तिचा खुन करण्याची खळबळजनक घटना पुनावळे येथे घडली. याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी पतीला अटक (Pune Crime) केली आहे.

राहुल गोकुळ प्रतापे (वय ३०, रा. विजयनगर, माळवाडी, पुनावळे) असे खुन करणार्‍या पतीचे नाव आहे. गौरी राहुल प्रतापे (वय २१) असे खुन झालेल्या पत्नीचे नाव आहे. याप्रकरणी रिक्षाचालक नवनाथ बोरगे यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल आणि गौरी प्रतापे हे पतीपत्नी असून राहुल हा गौरीच्या चारित्र्याचा संशय घेत असे. मंगळवारी रात्री सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास भारत लोंडे यांच्या घरामागे या दोघांमध्ये वाद झाला. त्यावेळी रागाच्या भरात राहुल याने गौरी हिच्या डोक्यात कोयत्याने वार करुन तिचा खुन केला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त आनंद भोईटे, सहायक पोलीस आयुक्त श्रीकांत डिसले,  हिंजवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत व त्यांचे सहकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी राहुल प्रतापे याला अटक केली असून पोलीस उपनिरीक्षक महेंद्र गाढवे तपास करीत आहेत.

हे देखील वाचा

Police Inspector Transfer | पुणे ग्रामीण, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूरमधील 14 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

PM Kisan | चुकीच्या पद्धतीने हप्ता घेणार्‍यांवर सरकारची कारवाई, राज्यांनी सुरू केली वसूली प्रक्रिया

Numerology and Career | स्वतःच्या जन्म तारखेवरून निवडा योग्य करियर, आकड्यांचा जीवनावर होणार परिणाम माहित आहे का?, जाणून घ्या


ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Pune Crime | wife murder by husband

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update