Pune Crime | ‘माझे पती PSI आहेत’, पोलीस उपनिरीक्षकाच्या पत्नी आणि सासूचा महिलेवर प्राणघातक हल्ला

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | जागेच्या वादातून (Land Dispute In Pune) पोलीस उपनिरीक्षकाच्या (PSI) पत्नी व सासूने राडा घालत एका महिलेला जिवे मारण्याचा प्रयत्न (Attempt To Kill) केल्याचा प्रकार हिंजवडी पोलीस ठाण्याच्या (Hinjewadi Police Station) हद्दीत घडला आहे. हा प्रकार पुण्यातील (Pune Crime) बावधन बुद्रुक (Bavadhan Budruk) येथे बुधवारी (दि.23)  दुपारी अडीच ते तीनच्या सुमारास घडला आहे.

 

याबाबत महिलेने शनिवारी (दि.26) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. महिलेच्या फिर्यादेवरुन पोलिसांनी दोन महिलांविरुद्ध सदोष मनुष्य वधाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई येथील प्रोबेशनरी पोलीस उपनिरीक्षकाची (Probationary PSI Mumbai) पत्नी बावधन येथे तिच्या माहेरी आली आहे.
तिच्या वडिलांच्या नात्यातील एका कुटुंबासोबत जागेच्या बांधकामावरुन वाद आहेत.
याच वादातून फिर्यादी महिलेची सासू आरोपी महिलेच्या घरी गेल्या.
आमच्या जागेत बांधकाम (Construction) करु नका, असे फिर्यादी यांच्या सासूने आरोपी मायलेकींना सांगितले. त्यावेळी आरोपींनी त्यांना मारहाण (Beating) केली.

फिर्यादी यांच्या सासूला सोडवण्यासाठी त्यांचे सासरे (Father-in-Law) आणि पती (Husband) गेले असता आरोपींनी फिर्यादी यांच्या सासऱ्यांना ढकलून दिले.
याबाबत फिर्यादी यांचे पती आणि सासू (Mother-in-Law) पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यासाठी गेले.
त्यावेळी फिर्यादी महिला आणि त्यांचे आजारी सासरे घरात असताना आरोपी घरात आले.
त्यांनी फिर्यादीला मोठा दगड फेकून मारला. या दगडामुळे फिर्यादी यांचा मृत्यू होऊ शकतो, याची जाणी असतानाही त्यांनी हे कृत्य केले.
फिर्यादी यांनी दगड चुकवल्यानंतर आरोपींनी त्यांचे केस पकडून गरागरा फिरवले. तसेच त्यांच्या तोंडावर चापटी मारुन बुक्क्यांनी मारहाण केली.
माझा नवरा पीएसआय आहे, तुला बघतेच, असे म्हणत आरोपीने धमकी दिली, असे फिर्यादीत नमूद केले आहे.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक तुकाराम खडके (PSI Tukaram Khadke) करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | wife of the police sub inspector and PSI mother in law attempt to kill a woman Hinjewadi police pimpri chinchwad

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Water Supply | पुण्यातील पाणीसमस्या 2-4 दिवसांत मार्गी लागेल – खासदार गिरीश बापट

 

Nandurbar Police | नंदुरबार पोलिसांचा अनोखा उपक्रम ! जिल्ह्यात पोलीसांकडून 30 ठिकाणी पाणपोईंची सोय

 

Uric Acid And Vitamin C Deficiency | ‘विटामिन-सी’च्या कमतरतेमुळे सुद्धा होऊ शकते यूरिक अ‍ॅसिडची समस्या, ‘या’ वस्तूंचा आजच करा आहारात समावेश