Pune Crime | पत्नीचा गळा आवळून केला खून, लोहगावमधील घटना

पुणे : Pune Crime | अल्पवयीन असताना तरुणीला पळवून नेल्याने त्याच्यावर गुन्हा (FIR) दाखल झाला. त्यानंतर जामीनावर सुटल्यावर त्याने पुन्हा तिला पळवून नेऊन तिच्याबरोबर रहात असताना भाऊबीजेला भावाकडे जाण्याची मागणी केल्याने पत्नीचा गळा आवळून खून (Murder in Pune) केल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)

चेतन ऊर्फ आकाश सोमनाथ मिसाळ Chetan alias Akash Somnath Misal (वय २३, रा. लोहगाव) याला विमानतळ पोलिसांनी (Pune Police) अटक (Arrest) केली आहे.

याबाबत टिंगरेनगर येथील एका ३५ वर्षाच्या महिलेने विमानतळ पोलीस ठाण्यात (Vimantal Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ४०७/२२) दिली आहे. हा प्रकार लोहगाव येथील लेन नं. ९ मध्ये बुधवारी मध्यरात्री बारा वाजता घडला होता. विमानतळ पोलिसांनी चेतन याच्यावर खूनासह पोक्सोखाली (Pocso Act) गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, फिर्यादी यांची १७ वर्षाची अल्पवयीन मुलीला चेतन मिसाळ याने नोव्हेंबर २०१८ रोजी पळवून नेले होते. त्यावेळी त्याच्यावर गुन्हा दाखल केला होता. त्या गुन्ह्यात तो जामिनावर सुटल्यानंतर त्याने फिर्यादी यांच्या मुलीला पुन्हा पळवून नेले. येरवडा पोलीस ठाण्यात (Yerwada Police Station) २०१९ मध्ये त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, त्यानंतर दोघेही घरच्यांना कळू न देता लोहगाव येथे भाड्याची खोली घेऊन रहात होते. तिच्यासोबत तो सतत भांडणे करुन तिला मारहाण (Beating) करीत असे. दिवाळीत भाऊबीजेला माहेरी जाण्याचा हट्ट तिने केला. यावरुन त्यांच्यात भांडणे झाली.

२६ ऑक्टोबरला मध्यरात्रीच्या सुमारास त्यांच्यात पुन्हा वाद झाला.
तेव्हा त्याने पाठीमागून ओढणीने तिचा गळा आवळला. त्यात तिचा मृत्यु झाला.
या प्रकाराने घाबरल्यावर त्याने शेजारी राहणार्‍यांना ती बेशुद्ध पडल्याचे सांगितले.
त्यांनी तिला तातडीने रुग्णालयात नेले. तेथे डॉक्टरांनी तपासल्यावर एकूण प्रकार त्यांच्या लक्षात आला.
त्यांनी विमानतळ पोलिसांना फोन करुन घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलीस तातडीने रुग्णालयात पोहचले
व त्यांनी चेतन मिसाळ याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गळा दाबून खून केल्याची कबुली दिली.
सहायक पोलीस निरीक्षक सपकाळे (Assistant Police Inspector Sapkale) अधिक तपास करीत आहेत.

Web Title :- Pune Crime | Wife strangled to death, incident in Lohgaon

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

RRR चित्रपटाने फडकावला अटकेपार झेंडा, सर्वश्रेष्ठ आंतरराष्ट्रीय चित्रपटासाठी मिळाला ‘हा’ पुरस्कार

T20 World Cup | पाकिस्तानचे भवितव्य आता भारताच्या हातात, नेमके काय आहे वर्ल्डकपचे समीकरण

Earthquake Koyna Dam | कोयना परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का