Pune Crime | पत्नीच्या प्रियकराचा पतीवर कोयत्याने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न; संगमवाडी गावठाणातील घटना

पुणे : Pune Crime | पत्नीशी प्रेमसंबंधातून वाद झाल्यानंतर प्रियकराने पतीच्या डोक्यात कोयत्याने वार करुन त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. (Pune Crime)

याप्रकरणी संगमवाडी येथे राहणार्‍या एका ३२ वर्षाच्या तरुणाने येरवडा पोलीस ठाण्यात (Yerwada Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ६०७/२२) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी कानिफनाथ ऊर्फ कानक्या कोलार (वय ४०, रा. संगमवाडी) याला अटक केली आहे. हा प्रकार संगमवाडी गावठाणातील (Sangamwadi Gaothan) गणेश मंदिरासमोरील रोडवर शनिवारी रात्री साडेआठ वाजता घडला. (Pune Crime)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या पत्नीपासून मागील दोन वर्षापासून वेगळे रहात आहेत. त्यांची पत्नी आणि कानिफनाथ कोलार यांच्यामध्ये प्रेमसंबंध असल्याने त्यावरुन फिर्यादी आणि आरोपींमध्ये वाद झाला होता. फिर्यादी हे शनिवारी रात्री रिक्षातून घरी जात होते. त्यावेळी कोलार याने रिक्षा थांबवून त्यांना शिवीगाळ केली. रिक्षातून खाली खेचून त्यांच्याजवळील कोयत्याने फिर्यादी यांच्या डोक्यात व हातावर वार करुन गंभीर जखमी केले. त्यानंतर तो पळून गेला. फिर्यादी यांना नवी सांगवीतील प्राईम मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

पोलिसांनी कानिफनाथवर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक पाटील तपास करीत आहेत.

Web Title :- Pune Crime | Wife’s lover attempts to stab husband to death; Incident in Sangamwadi Gaothan

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Immune System In Summer | ‘हे’ 5 फूड उन्हाळ्यात इम्युनिटी करू शकतात कमजोर, डाएटमधून आजच काढा बाहेर; जाणून घ्या

Body Hydration Tips | ‘या’ ऋतूमध्ये शरीराच्या हायड्रेशनवर विशेष लक्ष ठेवा, ‘या’ गोष्टींचं सेवन फायदेशीर; जाणून घ्या