Pune Crime | सोमवार पेठेतील मोबाईल शॉपीच्या भिंतीला पाडलं ड्रिलमशीननं मोठं भगदाड; 52 लाखांचे 307 मोबाईल लंपास

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पुण्यातील सोमवार पेठेतील खुराणा सेल्स (Khurana Sales in Somwar Peth)…
Pune Crime With the help of a drill machine the thieves smashed the wall of the mobile shoppe in somwar peth and stolen 307 mobile phones worth Rs 52 lakh
file photo

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पुण्यातील सोमवार पेठेतील खुराणा सेल्स (Khurana Sales in Somwar Peth) मोबाईल दुकानातून (Mobile Shoppe) चोरट्यांनी 52 लाख 30 हजार रुपये किंमतीचे तब्बल 307 मोबाईल चोरल्याची घटना (Pune Crime) घडली आहे. ड्रिलमशीनच्या (Drill Machine) सहाय्याने दुकानाच्या भिंतीला भगदाड पाडून चोरट्यांनी डल्ला मारला आहे. ही घटना गुरूवारी मध्यरात्रीच्या दरम्यान घडली आहे. चोरट्यांनी रेकी करून ही चोरी केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. याप्रकरणी मुकेश सरदारलाल खुराना (Mukesh Sardarlal Khurana) यांनी समर्थ पोलिस ठाण्यात (Samarth Police Station) फिर्याद दिली. (With the help of a drill machine, the thieves smashed the wall of the mobile shoppe in somwar peth and stolen 307 mobile phones worth Rs 52 lakh)

 

याबाबत माहिती अशी की, सोमवार पेठेतील एका इमारतीमध्‍ये खुराना सेल्स मोबाइल शॉपी नावाचे दुकान आहे. दुकानाच्या मालकाने नेहमीप्रमाणे गुरुवारी रात्री दुकान बंद केले होते. त्यानंतर शुक्रवारी सकाळी दुकान उघडल्‍यानंतर चोरी झाल्याचे उघडकीस आले आहे. दरम्यान, दुकानाच्या एका बाजूला जूनावाडा आहे. त्या बाजूने कोणी जात नसल्याचे पाहून चोरट्यांनी भिंतीला भगदाड पाडून दुकानात प्रवेश केला. दुकानातील 52 लाख 30 हजार रुपये किंमतीचे तब्बल 307 मोबाईल चोरुन नेले आहे. (Pune Crime)

दुकान मालकाने फिर्याद दिल्यानंतर चोरट्यांविरुद्ध समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा (FIR) दाखल झाला आहे.
या दरम्यान, पोलिस उपायुक्त डॉ. प्रियांका नारनवरे (DCP Dr. Priyanka Narnaware), सहायक पोलिस आयुक्त सतीश गोवेकर (ACP Satish Govekar), वरिष्ठ पोलिस निरिक्षक विष्णु ताम्हणे (Senior Police Inspector Vishnu Tamhane)
आदींनी घटनास्‍थळी पाहणी केली.

 

 

Web Title :- Pune Crime | With the help of a drill machine the thieves smashed the wall of the mobile shoppe in somwar peth and stolen 307 mobile phones worth Rs 52 lakh

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

 

 

Total
0
Shares
Related Posts
Pune Crime News | Rickshaw driver commits suicide by hanging himself after calling his sister due to wife's immoral relationship with friend; Police register case against wife and friend, incident in Handewadi

Pune Crime News | मित्राबरोबरच्या पत्नीच्या अनैतिक संबंधामुळे रिक्षाचालकाने बहिणीला फोन करुन गळफास घेऊन केली आत्महत्या; पत्नी व मित्रावर पोलिसांनी केला गुन्हा दाखल, हांडेवाडी येथील घटना