Pune Crime | आर्यन खान ड्रग्ज केसमधील NCB चा पंच किरण गोसावीवर फसवणूकीसह पिस्तुल दाखवून धमकाविल्याचा गुन्हा दाखल

पुणे : Pune Crime | आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात (aryan khan drugs case) साक्षीदार असलेल्या किरण गोसावी (kiran gosavi) याने नोकरीच्या आमिषाने तरुणांची फसवणूक केल्याबरोबर पैसे परत मागण्यासाठी आलेल्यांना पिस्तुलाचा धाक दाखवून धमकाविल्याचेही उघडकीस आले आहे. वानवडी पोलीस ठाण्यात (Wanwadi Police Station) त्याच्यावर आणखी एक गुन्हा (Pune Crime) दाखल झाला आहे.

किरण प्रकाश गोसावी (रा. सानपाडा), त्याचा सहकारी आणि कुसुम गायकवाड (रा. कॅम्प) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी प्रकाश माणिकराव वाघमारे (वय ४८, रा. महंमदवाडी) यांनी वानवडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

किरण गोसावी याने फिर्यादी व त्यांचे इतर दोन मित्रांना मलेशिया अथवा परदेशात नोकरी लावणेबाबत वेगवेगळ्या योजनांची माहिती देऊन विश्वास संपादन केला. त्यांना १३ नोव्हेंबर २०१८ मध्ये क्रोम मॉल चौक येथे भेट घेतली. त्याच्याबरोबर एक सहकारी व कुसुम गायकवाड हे होते. त्यांनी तिघांना मलेशिया येथे ५५ हजार रुपये दरमहा पगाराची नोकरी लावून देतो. व्हिजा, हॉटेलचे बुकींग व इतर सोयीसुविधा करुन देतो, असे सांगून फिर्यादी यांच्याकडून रोख ५५ हजार रुपये व बँक खात्यातून ९० हजार रुपये असे १ लाख ४५ हजार रुपये घेतले. मलेशिया येथे जाणेसंबंधीचे अर्धवट कागदपत्रे व विमान तिकीट व वास्तव्याचे बुकींगचे कागदपत्रे दिली. ही कागदपत्रे अर्धवट असल्याने त्यांना तेथे जाण्यास अडचणी (Pune Crime) निर्माण झाली.

त्यानंतर फिर्यादी व त्यांच्या मित्रांनी पुन्हा त्यांना मलेशियाला पाठवावे अथवा पैसे परत द्यावे,
यासाठी गोसावीच्या कार्यालयात जाऊन ते भेटले.
तेव्हा त्याने पिस्तुल दाखवून जीवे ठार मारण्याची (Pune Crime) धमकी दिली.
त्यामुळे त्यांनी घाबरुन आतापर्यंत तक्रार दिली नव्हती.
आता पोलिसांनी त्याला अटक केल्याचे समजल्यानंतर ते तक्रार देण्यासाठी पुढे आले आहेत.
सहायक पोलीस निरीक्षक जयवंत जाधव (API Jaywant Jadhav) तपास करीत आहेत.

हे देखील वाचा

Pune : ‘स्वराधीन’ ज्येष्ठ संगीतकार, व्हायोलिन वादक प्रभाकर जोग यांचे पुण्यात 89 व्या वर्षी निधन

Pune Crime | पुण्याच्या बालेवाडीत स्लॅब कोसळून 7 कामगार जखमी; तब्बल पावणे दोन तासांनी अग्निशमन दलाला कळविली माहिती

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Pune Crime | witness of ncb in aryan khan drugs case Kiran Gosavi charged with threatening to show pistol with fraud in pune

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update